आय.बी.एम्. या जागतिक माहिती तंत्रज्ञान आस्थापनानेही उचलले पाऊल

डिअरबॉर्न (अमेरिका) – वाहनांचे उत्पादन करणारे जगविख्यात आस्थापन ‘फोर्ड’ने त्याच्या शेकडो अनुभवी ‘मानवी’ अभियंत्यांना पुन्हा कामावर घेतले आहे. हे अभियंते अशा गुणवत्तेशी संबंधित समस्यांवर काम करतील, ज्यांचे निराकरण ‘एआय’ आधारित स्वयंचलित प्रणालींना जमले नाही. याच प्रमाणे ‘कॉमनवेल्थ बँक ऑफ ऑस्ट्रेलिया’ आणि ‘आय.बी.एम्.’ यांसारख्या प्रसिद्ध आस्थापनांनीही एआय तंत्रज्ञानात गुंतवणूक करतांना कर्मचार्यांना कामावरून कमी केले होते; परंतु आता त्यांनीही पुन्हा एकदा मानवी मनुष्यबळावर लक्ष केंद्रीत केल्याचे पहायला मिळत आहे.
एआय सर्वकाही करू शकत नाही !
विश्लेषकांच्या मते, एआयचा अधिक वापर करतांना कर्मचार्यांना कामावरून कमी करणे, हा व्यवसायाच्या वाढीसाठी सर्वोत्तम मार्ग ठरेलच, असे नाही. याआधी आस्थापनांना वाटत होते की, एआय सर्व काही करू शकते; परंतु आता त्या विचारात परिवर्तन होत आहे.
६ तज्ञ अथवा संस्था यांनी ‘एआय’च्या मर्यादेवर मांडलेले विचार !
१. ‘‘एआय हे एक उत्कृष्ट साधन आहे; परंतु त्याला प्रशिक्षित करण्यासाठी वापरली जाणारी माहिती जितकी दर्जेदार असेल, तितकीच ती प्रणाली प्रभावी ठरते !’ – ‘फोर्ड’चे ‘व्हेईकल हार्डवेअर इंजिनिअरिंग’ विभागाचे उपाध्यक्ष चार्ल्स पून
२. ‘कॉमनवेल्थ बँक ऑफ ऑस्ट्रेलिया’ने स्वीकारले की, कर्मचार्यांना कमी करण्याची घोषणा करतांना त्यांनी ‘व्यवसायाच्या दृष्टीने सर्व संबंधित गोष्टींचा पुरेसा विचार केला नव्हता’ आणि ‘आवश्यक असलेल्या भूमिकांचे मूल्यांकन करतांना अधिक सखोल विचार करायला हवा होता.’
३. ‘आय.बी.एम्.’ने त्याच्या मानवी संसाधन विभागातील कामांसाठी एआयचा वापर चालू केला. या प्रणालीने ९४ टक्के नियमित विनंत्या हाताळल्या; परंतु नैतिक पेचप्रसंग असलेल्या उर्वरित ६ टक्के बाबी हाताळण्यात ती अपयशी ठरली. पुढे आस्थापनाने वर्ष २०२६ मध्ये आपल्या सर्व व्यावसायिक विभागांमध्ये अमेरिकेत ‘एन्ट्री-लेव्हल’ (प्रारंभिक स्तरावरील) कर्मचार्यांची भरती तिप्पट करण्याची योजना घोषित केली.
४. ‘ऑटोमेशन’चा (स्वयंचलित तंत्रज्ञानाचा) पुरस्कार करणार्या अनेक आस्थापनांना नंतर कर्मचार्यांना कमी करण्याच्या निर्णयाचा पश्चाताप झाला; कारण त्यांनी अशाच लोकांना कामावरून काढले होते, ज्यांची एआयवर देखरेख करण्यासाठी आवश्यकता होती. – ‘इंट्युशन लॅब्ज’चा अहवाल
५. ३९ टक्के व्यावसायिक नेत्यांनी एआयच्या कार्यवाहीमुळे (अंमलबजावणीमुळे) कर्मचार्यांना कामावरून कमी केले. तथापि यांपैकी ५५ टक्के मालकांनी स्वीकारले की, कर्मचार्यांना कमी करण्याविषयीचे त्यांचे निर्णय चुकीचे होते ! – ‘ऑर्गव्ह्यू’चा अहवाल
६. एआयमुळे कामाच्या ठिकाणी परिवर्तन होत आहे; परंतु हे स्पष्ट होत आहे की, कामगारांना काढून टाकण्यापेक्षा मानव आणि एआय यांच्यातील सहकार्य विकसित करण्यात संस्थांना अधिक मूल्य दिसून येत आहे ! – ‘कॅपिटल टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी’चे मत
बांगलादेश : इस्कॉनचे कारागृहात असलेले चिन्मय प्रभु यांच्या जिवाला गंभीर धोका !
POK Protests : पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग नसून जर दडपशाही थांबली नाही, तर भारतासमवेत जाऊ !
सिंधु जल वाटप करारावर पाकने अणू धोरण पालटून अणूबाँबचा वापर करावा ! – Bilawal Bhutto
Jakarta Pandit Dhirendrakrishna Shastri : श्रीराममंदिरातील दान चोरीतील मोठी नावे उघड केली, तर ते मला ठार मारतील !
Pakistan Gurdwara : पाकिस्तानात १२५ वर्षे जुने गुरुद्वारा भुईसपाट करण्याचा प्रयत्न
चीनच्या सैन्यासमवेत प्रतिवर्षी १ सहस्र १०० वेळा होतो सामना ! – General Upendra Dwivedi