
अहिल्यानगर – पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या धर्तीवर आता प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथील शनी मूर्तीला (शिळेला) दीर्घकालीन संवर्धनासाठी वज्रलेप करण्यात येणार आहे, असे वृत्त आहे. प्रतिदिन होणारा १ सहस्र ५०० किलो तेलाचा अभिषेक, ऊन-पावसासह पालटणारे हवामान आणि वाढती गर्दी, यांमुळे मूर्तीची झिज होत असल्याचा निष्कर्ष तज्ञांनी काढला आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील पुरातत्व विभागाच्या तज्ञांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

देवस्थान प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविषयीची गंभीर सूत्रे –
१. भेसळयुक्त तेलाचा विळखा आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !
शनिशिंगणापूर परिसरात भाविकांकडून मूर्तीवर प्रतिदिन सहस्रो लिटर तेल अर्पण केले जाते; मात्र या तेलाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी देवस्थान प्रशासनाकडे सध्या कोणतीही स्वतंत्र पडताळणी यंत्रणा किंवा प्रयोगशाळा उपलब्ध नाही. परिसरात सर्रास निकृष्ट आणि भेसळयुक्त तेलाची विक्री होत असल्याच्या तक्रारी भाविक अन् सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून सातत्याने होत आहेत. या रासायनिक भेसळीमुळेच श्री शनिदेवाच्या मूर्तीला हानी पोचत असून वर्ष २०२२ मध्ये मूर्तीचा काही भाग तुटल्याचेही समोर आले होते. अन्न आणि औषध प्रशासनाने याकडे पूर्णपणे डोळेझाक केली असून भाविकांच्या आरोग्याशी आणि हिंदूंच्या श्रद्धास्थानांशी खेळ मांडणार्या अशा भेसळखोरांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. (जोपर्यंत देवस्थान प्रशासन परिसरातील भेसळयुक्त तेलाची विक्री रोखत नाही आणि रासायनिक साहित्यावर बंदी घालत नाही, तोपर्यंत केवळ रासायनिक प्रक्रिया करून मूर्तीचे रक्षण होणार नाही ! – संपादक)
२. पूजा साहित्याविषयी कठोर नियमावलीची आवश्यकता !
श्री शनिदेवाच्या मूर्तीवर तेलासह काळे तीळ, रासायनिक रंग असलेले काळे कापड, नारळ आणि घोड्याची लोखंडी नाळ अर्पण करण्याची चुकीची पद्धत सध्या वाढली आहे. या वस्तूंच्या घर्षणामुळे आणि रासायनिक प्रक्रियेमुळे पवित्र मूर्तीच्या पृष्ठभागावर विपरीत परिणाम होत आहे. हिंदु धर्मातील शास्त्रांनुसार मूर्तीचे पावित्र्य राखण्यासाठी आणि भाविकांच्या श्रद्धेचे रक्षण करण्यासाठी देवस्थान प्रशासनाने पूजेच्या साहित्याविषयी तातडीने एक निश्चित नियमावली लागू करणे आवश्यक आहे.
३. अतीमहनीय व्यक्तींसाठी विशेष दर्शन सुविधा !
चौथर्यावर जाऊन श्री शनीदेवाचे दर्शन घेण्यासाठी सामान्य भाविकांकडून ५०० रुपये शुल्क आकारले जाते, तर दुसरीकडे अतीमहनीय व्यक्तींना दर्शनासाठी प्रशासनाकडून पायघड्या घातल्या जातात. विविध शिफारसी घेऊन येणारे राजकीय नेते आणि अधिकारी यांना कोणतेही शुल्क न आकारता थेट दर्शन दिले जाते.
श्री शनीदेवाच्या मूर्तीसाठी भेसळयुक्त तेल वापरू नये ! – सौ. पुष्पाताई बाळासाहेब बानकर, सरपंच, शनिशिंगणापूर
श्री शनीदेवाच्या मूर्तीला वज्रलेप करण्याविषयी प्रक्रिया चालू असल्याची माहिती आहे. येथे बाहेर दुकानांमध्ये कोणतेही तेल मिळते. ते तेल भेसळयुक्त असते. त्या तेलामुळे मूर्तीवर वेगळ्या स्वरूपाचे ओघळ येतात. त्या तेलामध्ये भेसळ असल्यामुळे मूर्तीची झीज होऊ शकते. आमची मागणी आहे की, मूर्तीवर वहाण्यासाठी खाद्यतेलच वापरले पाहिजे. म्हणजे जे तेल आपण स्वयंपाकात वापरतो, तेच मूर्तीलाही वाहिले पाहिजे, तरच त्याचा लाभ होऊ शकतो. अन्य तेलामध्ये भेसळ असते, उदाहरणार्थ या ठिकाणी मोहरीचे तेल मिळते; मात्र ते अखाद्यतेल आहे. त्यामुळे त्याच्या दर्जाविषयी काहीही सांगता येत नाही. याविषयी माजी सरपंच श्री. बाळासाहेब बानकर यांनीही मागे पत्रव्यवहार केला होता की, जे तेल बाहेर विकत मिळते, तर ते शुद्ध तर असावे, अन्यथा देवस्थानाने दोन किंवा तीन ‘ब्रँड’ची (उत्पादकांची) नावे सांगावीत. त्याच आस्थापनाचे तेल विकत घेता येईल, जेणेकरून ते शुद्ध असल्याची निश्चिती असेल आणि त्यामुळे मूर्तीवर कुठलाही वाईट परिणाम होणार नाही.
Naira Energy Cuts Prices : पेट्रोल ५ रुपये, तर डिझेल ३ रुपयांनी केले स्वस्त
CBI Arrests Pradeep Kumar : हरियाणा : निवृत्तीच्या काही घंटे आधीच आय.ए.एस्. अधिकार्याला ‘सीबीआय’ कडून अटक !
गाय हिंदूंसाठी पवित्र : तिच्या हत्येमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात ! : Gujarat High Court
श्री तुळजाभवानी देवीच्या ४ सहस्र एकर भूमीच्या घोटाळ्याची सखोल चौकशी करा !
कोकणातील देवराई भूमी ‘शासन जमा’ करण्याच्या कारवाईची चौकशी करा ! – महसूलमंत्र्यांचे उपसचिवांना निर्देश
Nimbooda Song Controversy : ओडिसाच्या इयत्ता ५ वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकात हिंदी चित्रपटातील ‘निंबुडा निंबुडा’ या गाण्याचे बोल समाविष्ट !