सिंधु जल वाटप करारावर पाकने अणू धोरण पालटून अणूबाँबचा वापर करावा ! – Bilawal Bhutto

‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’चे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांची भारताला धमकी

पाकिस्तान पीपल्स पार्टी’चे अध्यक्ष बिलावल भुट्टो

इस्लामाबाद (पाकिस्तान) – सिंधु जल वाटपाच्या वादाकडे केवळ पर्यावरणीय किंवा राजनैतिक सूत्र म्हणून पाहिले जाऊ नये, तर राष्ट्रीय सुरक्षा आणि अस्तित्व यांच्याशी संबंधित सूत्र म्हणून पाहिले पाहिजे. पाकिस्तानचे अणू धोरण काही अत्यंत कठीण परिस्थितींसाठी आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची कोंडी करण्याचा किंवा त्याचे जलमार्ग रोखण्याचा प्रयत्न, या घटना अशा दुर्मिळ परिस्थितींमध्ये मोडतात. जर पाकिस्तानचे पाण्याचे स्रोत बंद झाल्याने अणू संकटासारखी परिस्थिती निर्माण होत असेल, तर पाकिस्तानने याकडे केवळ पर्यावरणाचे सूत्र म्हणून पाहू नये, तर पाकिस्तानच्या अस्तित्वावरील आक्रमण म्हणून पाहिले पाहिजे, ज्याला एकत्रितपणे सैनिकी उत्तर देण्याची आवश्यकता आहे, अशी धमकी  ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’चे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी सिंधु जल वाटप करार स्थगित करण्यावरून भारताला दिली. इस्लामाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

पाकिस्तानची अनुमाने ८० टक्के शेतभूमी आणि अर्थव्यवस्था सिंधु नदी प्रणालीच्या पाण्यावर अवलंबून आहे. सिंधु जल वाटप करारानुसार पूर्व नद्यांचे (रावी, बियास, सतलज) पाणी भारताकडे आहे आणि पश्चिम नद्यांचे (सिंधू, झेलम, चिनाब) पाणी पाकिस्तानला मिळते. पाकचा आरोप आहे की, भारताने धरणे आणि कालवे बांधून, तसेच ‘हायड्रोलॉजिकल डेटा शेअर’ न करून त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन केले आहे, ज्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था आणि ऊर्जा क्षेत्र धोक्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

जर पाकने भारताच्या विरोधात अणू बाँबचा वापर करण्याचा प्रयत्न केला, तर पाकिस्तानी जगाच्या नकाशावरून नष्ट होणार, हे त्याने नेहमीच लक्षात ठेवावे !