श्रीराममंदिरातील दान चोरीतील आरोपी अविनाश शुक्ला यांची स्वीकृती
पैशांची चोरी करतांना सर्व आरोपी एकमेकांना साहाय्य करायचे !
चोरत असतांना इतर आरोपी त्याच्या भोवती घोळका करून उभे रहायचे !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिरातील दानाच्या चोरीचे कोट्यवधी रुपये आधी मंदिराच्या प्रसाधनगृहात लपवले जायचे आणि त्यानंतर संधी मिळताच ते बाहेर काढले जायचे, अशी स्वीकृती आरोपी अविनाश शुक्ला याने दिली. न्यायालयाच्या अनुमतीनंतर विशेष अन्वेषण पथकाने कारागृहात जाऊन अविनाश याची २ घंटे चौकशी केली, त्या वेळी त्याने ही स्वीकृती दिली. तसेच देणगी मोजणी प्रक्रियेतील त्रुटींचा अपलाभ कसा घेतला ?, याचीही संपूर्ण माहिती त्याने पोलिसांना दिली.
या देणगी मोजणीच्या प्रक्रियेत ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे विश्वस्त अनिल मिश्रा यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती, असा दावा अविनाश याने केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश याने सांगितले की, ज्या खोलीत देणगीचे पैसे मोजले जायचे, त्या खोलीची एक किल्ली टिन्नू यादव याच्याकडे असायची, तर दुसरी किल्ली बँकेच्या कर्मचार्यांकडे असायची. हा सगळा प्रकार एका मोठ्या साखळीद्वारे केला जात होता. पैशांची चोरी करतांना सर्व आरोपी एकमेकांना साहाय्य करायचे. एक जण पैसे चोरत असतांना इतर आरोपी त्याच्याभोवती घोळका करून उभे रहायचे, जेणेकरून कुणाला संशय येऊ नये. मंदिराच्या परिसरात कुठे आणि कोणते कॅमेरे बसवले आहेत ?, याची खडान्खडा माहिती सर्व आरोपींना होती. याच माहितीचा अपलाभ घेत ते कॅमेर्यांच्या नजरेतून सुटायचे. चोरलेले पैसे ते आधी प्रसाधनगृहामध्ये लपवून ठेवायचे आणि नंतर सोयीनुसार तेथून बाहेर काढून न्यायचे. न्यासाच्या बड्या पदाधिकार्यांशी जवळचे संबंध असल्याने आमच्यावर कुणी संशय घेतला नाही आणि आमच्यावर फारशी पाळतही ठेवली गेली नाही, असेही त्याने मान्य केले.
चोरीच्या पैशांतून खरेदी केली भूमी आणि घर !
चोरलेल्या पैशांमधून आरोपींनी भूमी आणि आलिशान घर खरेदी केल्याचे अन्वेषणात समोर आले आहे. पोलीस आता आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची आणि मालमत्तेची कसून चौकशी करत आहेत.
अन्वेषण पथक स्थापन होण्यापूर्वीच ५८ लाख रुपयांची वसुली !
उत्तरप्रदेश सरकारने १३ जून या दिवशी या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष अन्वेषण पथकाची स्थापना केली होती. गुन्हा नोंदवण्यापूर्वी, म्हणजेच ५ जून या दिवशी न्यासाने अविनाश शुक्ला याच्या घरातून ५८ लाख रुपये हस्तगत केले होते. उर्वरित रक्कम ५ ते ८ जून या काळात ‘बँक ट्रान्सफर’द्वारे परत मिळवण्यात आली होती.

शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या मूर्तीच्या संवर्धनासाठी वज्रलेपन करणार !
गाय हिंदूंसाठी पवित्र : तिच्या हत्येमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात ! : Gujarat High Court
श्री तुळजाभवानी देवीच्या ४ सहस्र एकर भूमीच्या घोटाळ्याची सखोल चौकशी करा !
कोकणातील देवराई भूमी ‘शासन जमा’ करण्याच्या कारवाईची चौकशी करा ! – महसूलमंत्र्यांचे उपसचिवांना निर्देश
Nimbooda Song Controversy : ओडिसाच्या इयत्ता ५ वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकात हिंदी चित्रपटातील ‘निंबुडा निंबुडा’ या गाण्याचे बोल समाविष्ट !
Sabarimala Gold Probe : शबरीमला सोने प्रकरणात ‘त्रावणकोर देवस्वम बोर्डा’च्या माजी अध्यक्षांच्या विरोधात मिळाले पुरावे !