केरळम् उच्च न्यायालयाकडून नवीन गुन्हा नोंदवण्यास अनुमती

कोच्ची (केरळम्) – शबरीमला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणात ‘त्रावणकोर देवस्वम बोर्डा’चे माजी अध्यक्ष पी.एस्. प्रशांत यांच्या विरोधात महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्यांच्याकडे अनेक अधिकारी आणि बोर्डाचे सदस्य यांच्या भूमिकेशी संबंधित पुरेसे पुरावे आहेत, अशी माहिती विशेष अन्वेषण पथकाने केरळम् उच्च न्यायालयाला दिली. यावर उच्च न्यायालयाने ‘पथकाला हवे असल्यास वर्ष २०२५ मधील सोन्याच्या मुलामाच्या प्रकरणी स्वतंत्रपणे नवीन गुन्हा नोंद करता येईल किंवा वर्ष २०१९ मध्ये सोने गायब झाल्याशी संबंधित आधीच चालू असलेल्या प्रकरणात अन्वेषणाचे निष्कर्ष जोडता येतील’, असे सांगितले. काही इतर अधिकारी आणि बोर्डाचे माजी सदस्य यांच्या भूमिकेची चौकशी अजूनही चालू आहे. जर त्यांच्या विरोधात पुरेसे पुरावे मिळाले, तर पथक त्यांच्या विरोधातही कायदेशीर कारवाई करू शकते. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० जुलै या दिवशी होईल.
🚨 Sabarimala Gold Probe Update
Kerala HC allows fresh FIR as evidence surfaces against former Travancore Devaswom Board President P S Prashanth in the Sabarimala gold embezzlement case.
Key Points:
• Theft linked to 31 kg gold donated by Vijay Mallya for plating.• Gold… https://t.co/BDPZCfbR02 pic.twitter.com/VZG2jUEehJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 1, 2026
बोर्डाचे माजी अध्यक्ष पी.एस् प्रशांत यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, वर्ष २०२५ मधील सोन्याच्या मुलामाच्या प्रकरणात माझ्या विरोधात कोणताही थेट आरोप नाही. केवळ न्यायालयाची यासाठी अनुमती न घेतल्याचा आरोप आहे. मूर्तींना पुन्हा मुलामा देण्यासाठी पाठवतांना सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते. बोर्डाला वर्ष २०१९ मध्ये सोन्याच्या हेराफेरीविषयी कोणतीही माहिती नव्हती.
मंदिरातून ५०० कोटी रुपयांचे सोने चोरी झाल्याचा काँग्रेस नेत्याचा दावा
यापूर्वी या प्रकरणात पथकाला महत्त्वाची माहिती देणारे काँग्रेसचे नेते रमेश चेन्निथला यांनी दावा करत म्हटले होते की, मंदिराच्या सोन्याच्या चोरीत ‘त्रावणकोर देवस्वम बोर्डा’च्या जुन्या अधिकार्यांचे संगनमत असल्याचे नाकारता येणार नाही. माझा अंदाज आहे की, गायब झालेल्या मालमत्तेची किंमत अनुमाने ५०० कोटी रुपये असू शकते.
काय आहे प्रकरण ?
१. उद्योगपती विजय मल्ल्या यांनी मंदिराला ३१ किलो सोने दान केले होते. या दानातून मंदिरात विविध ठिकाणी सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे.
२. शबरीमला मंदिराचे गर्भगृह आणि द्वारपालक मूर्ती यांवर लावलेल्या सोन्याचा मुलामा असलेल्या तांब्याच्या प्लेट्समधून सोने काढून ते हडप करण्यात आले.
३. या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या केरळम सरकारच्या विशेष अन्वेषण पथकाला असे आढळले की, ‘देवस्वम बोर्डा’च्या अधिकार्यांनी योग्य अनुमतीविना या प्लेट्स बाहेर दिल्या आणि यात व्यावसायिक अन् इतर लोकांचे साटेलोटे होते.
४. चेन्नईमध्ये मूर्तींवरील सोन्याचा जुना थर काढण्यात आला होता. नवीन थर चढवण्यासाठी फार अल्प सोन्याची आवश्यकता होती; परंतु उरलेले सोने कथितरित्या गायब करण्यात आले.
५. काम व्यवस्थित न झाल्यामुळेही मूर्तींसाठी ४० वर्षांच्या ‘वॉरंटी’चे प्रमाणपत्र देण्यात आले. तरीही काही महिन्यांतच सोन्याचा थर खराब झाला आणि त्याखालील तांब्याचा पृष्ठभाग दिसू लागला.
६. वर्ष २०१९ मध्ये झालेल्या कथित सोन्याची अफरातफरा लपवण्यासाठी वर्ष २०२५ मध्ये मूर्ती पुन्हा चेन्नईला पाठवण्याची योजना आखण्यात आली. नोव्हेंबर २०२३ मध्ये पी.एस्. प्रशांत बोर्डाचे अध्यक्ष झाल्यानंतर मुख्य आरोपी उन्नीकृष्णन् पोट्टी याने त्यांचा विश्वास जिंकला आणि पुन्हा मुलामा देण्याचा प्रस्ताव मांडला. बोर्डाच्या काही सदस्यांना हे ठाऊक होते की, वर्ष २०१९ मध्ये शेष राहिलेले सोने अजूनही उन्नीकृष्णन् पोट्टीकडे आहे. तरीही कारवाई करण्याऐवजी त्यांनी कथितरित्या प्रकरण दाबण्यास साहाय्य केले.
७. या प्रकरणात मंदिराचे माजी पुजारी नंबूदरी उन्नीकृष्णन पोट्टी, सोने व्यापारी डी. मणी आणि ‘त्रावणकोर देवस्वम बोर्डा’चे माजी अध्यक्ष ए. पद्मकुमार या मुख्य आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. यासमवेत इतर ९ जणांनाही अटक करण्यात आली आहे.
हिंदु विवाह कायद्यानुसार विवाह वैध ठरण्यासाठी केवळ विवाहाचे प्रमाणपत्र असणे पुरेसे नाही ! – Gujrat High Court
(म्हणे) ‘आजच्या काळामध्ये वैकुंठगमन वगैरे म्हणणे मला पटत नाही, विशिष्ट वर्गाने थोपवलेल्या गोष्टी !’ – शरद पवार
Naira Energy Cuts Prices : पेट्रोल ५ रुपये, तर डिझेल ३ रुपयांनी केले स्वस्त
CBI Arrests Pradeep Kumar : हरियाणा : निवृत्तीच्या काही घंटे आधीच आय.ए.एस्. अधिकार्याला ‘सीबीआय’ कडून अटक !
शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या मूर्तीच्या संवर्धनासाठी वज्रलेपन करणार !
गाय हिंदूंसाठी पवित्र : तिच्या हत्येमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात ! : Gujarat High Court