(आय.आर्.सी.टी.सी. – इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन – भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ)

नवी देहली – येथील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी यादव आणि पुत्र तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध आय.आर्.सी.टी.सी. (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन – भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ) निविदा घोटाळ्याच्या प्रकरणी आरोप निश्चित केले.
Delhi Court frames charges against Lalu Prasad Yadav, Rabri Devi, and Tejashwi Yadav in the IRCTC tender scam
Lalu is already out on bail from previous convictions. Despite this, the world knows what his public image is!#IRCTCScam
PC: @airnewsalerts pic.twitter.com/N2UYUc3d61— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 13, 2025
न्यायालयाने म्हटले आहे की, ‘निविदा घोटाळ्याचा संपूर्ण कट लालूप्रसाद यादव यांच्या माहिती देऊन रचण्यात आला होता. त्यांचा निविदा वाटपाच्या प्रक्रियेत सहभाग होता.’ न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना विचारले, ‘तुम्ही आरोप मान्य करता का? दोषी असल्याचे मान्य करता का? कि तुम्हाला खटल्याला सामोरे जायचे आहे ?’ यावर लालूप्रसाद म्हणाले की, सर्व आरोप खोटे आहेत.
आय.आर्.सी.टी.सी. घोटाळा काय आहे ?
वर्ष २००४ ते २००९ या काळात लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री होते, तेव्हा रांची (झारखंड) आणि पुरी (ओडिशा) येथील आय.आर्.सी.टी.सी.च्या २ हॉटेल्सच्या देखभालीचे कंत्राट ‘सुजाता हॉटेल्स’ नावाच्या खासगी आस्थापनाला चुकीच्या पद्धतीने देण्यात आले. या व्यवहाराच्या बदल्यात लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबाला पाटणा येथील मौल्यवान भूमी मिळाल्याचा अन्वेषण यंत्रणेचा दावा आहे. यादव कुटुंबाव्यतिरिक्त, आय.आर्.सी.टी.सी. ग्रुपचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक व्ही.के. अस्थाना, आर्.के. गोयल आणि ‘सुजाता हॉटेल्स’चे संचालक विजय अन् विनय कोचर हेही या प्रकरणात आरोपी आहेत.
संपादकीय भूमिकालालूप्रसाद यादव यांना यापूर्वीच काही घोटाळ्यात शिक्षा झालेली असतांना त्यांना जामीन मिळाला आहे. असे असले, तरी जनतेच्या दृष्टीने त्यांची प्रतिमा काय आहे, हे जगाला ठाऊक आहे ! |
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin