छत्रपती शिवरायांचे शत्रू कर्नाटकमधील काँग्रेस सरकार !

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली आणि त्यांच्या काळातील सर्व इस्लामी सत्तांना आपल्या टाचेखाली दाबून हिंदवी स्वराज्य निर्माण केले. हिंदुस्थानच्या इतिहासातील पराभवाची परंपरा नष्ट करून विजयाची शृंखला चालू करणार्‍या छत्रपती शिवरायांविषयी कर्नाटक सरकारला कोणत्याही प्रकारचा आदर आणि श्रद्धा राहिलेली नाही. कर्नाटक सरकारने बेंगळुरूमधील ‘शिवाजीनगर’ या मेट्रोच्या रेल्वेस्थानकाचे नाव पालटून ‘सेंट मेरी’ असे नाव देण्याचा घाट घातला आहे. कर्नाटक सरकारची हीच कृती छत्रपती शिवरायांशी शत्रुत्वाचे नाते असल्याचे स्पष्ट करणारी आहे.

छत्रपती शिवरायांना विरोध करणारे काँग्रेसवाले !

१. काँग्रेसकडून चुकीचा इतिहास मांडण्यात धन्यता

कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आहे. काँग्रेसला आपल्या देशाच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक परंपरेचा अभिमान अजिबात नाही, तसेच राष्ट्राभिमानसुद्धा नाही. हे त्यांच्याच नेत्यांनी त्यांच्या कृतीने अनेक वेळा सिद्ध केले आहे. परकियांनी लिहिलेला हिंदुस्थानचा इतिहास सत्य मानून पाठ्यपुस्तकातून छत्रपती शिवरायांचा इतिहास गाळून इस्लामी इतिहास अनेक दशके उगवत्या पिढीला शिकवला आणि परकीय आक्रमकांविषयी श्रद्धा निर्माण केली. ‘छत्रपती शिवराय हे सहिष्णु होते. त्यांच्या सैन्यात मुसलमान होते’, असा असत्य इतिहास सातत्याने जनतेसमोर मांडण्यात धन्यता मानणारी काँग्रेस आणि त्यांचे बगलबच्चे राष्ट्रनिष्ठ आहेत, हे आपण कोणत्या आधारावर म्हणू शकतो ?

श्री. दुर्गेश परुळकर

२. …तर छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा करून दाखवावा !

आज आपल्या देशात ‘छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुसलमान होते’, असे सांगितले जाते. त्यावर विश्वास ठेवला, तर या विधानाचा अर्थ असा होतो की, छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य निर्मितीच्या राष्ट्रीय कार्याला मुसलमानांनी हातभार लावला. आता या विधानाची सत्यता पडताळून पहावयाची असेल, तर ‘छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुसलमान होते’, असे म्हणणार्‍यांनी देशातील इस्लामी वस्त्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा करून दाखवावा. जर त्याला मुसलमानांनी अनुमती दिली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार केला, तर ‘छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुसलमान होते’, हे सत्य कि असत्य, ते ठरवणे सहज सोपे होईल.

वास्तविक मुसलमानांना खरोखरच छत्रपती शिवरायांविषयी श्रद्धा असती, तर त्यांनी अफझलखान वधाच्या चित्राला विरोध करून दंगली घडवून आणल्या नसत्या. याचा अर्थ मुसलमान समाजाला छत्रपती शिवराय हे त्यांचे वाटत नाहीत.

३. कथित पुरोगाम्यांची निष्ठा कुठे गेली ?

संपूर्ण जगाचे इस्लामी राष्ट्रात रूपांतर करण्याचे ध्येय कुराणाने त्यांच्यासमोर ठेवले आहे. अल्लावाचून अन्य कुणासमोर नतमस्तक होण्याची अनुमती त्यांचा धर्म त्यांना देत नाही. अशा परिस्थितीत छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुसलमान होते, यावर विश्वास ठेवता येणार नाही. ‘छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास आम्हालाच काय तो ठाऊक आहे’, असा दावा करणारे त्यांचे तथाकथित भक्त कर्नाटकातील काँग्रेस सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात मूग गप्प बसले आहेत. आता त्यांची छत्रपती शिवरायांवरील निष्ठा कुठे गेली ?

४. काँग्रेसने केलेले महान पातक

काँग्रेस प्रथमपासून मुसलमानांचा पक्ष घेणारी आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीला साथ देऊन हिंदुस्थानचे विभाजन करण्याचे महान पातक काँग्रेसने केले आहे. मुसलमानांच्या तुष्टीकरणासाठी छत्रपती शिवरायांसारख्या राष्ट्रपुरुषाला नाकारण्याचे धाडस काँग्रेस सरकार वारंवार करत आले आहे. परमानंद यांच्या ‘शिवभारता’त आपल्याला पुढील उल्लेख आढळतो, ‘या पृथ्वीवर ज्याचा अवतार यवनांच्या विनाशाकरता झाला, त्या शिवाजीराजांनी यवनांशी केलेल्या अनेक युद्धांचे वर्णन यात आहे.’

केंद्र सरकारने नामांतराची मागणी फेटाळून लावणे आवश्यक !

केंद्र सरकारकडे कर्नाटक सरकारने ‘शिवाजीनगर’ या मेट्रो रेल्वेस्थानकाचे नाव पालटून ‘सेंट मेरी’ असे करण्यासाठी अनुमती मागितली आहे. केंद्र सरकारने कर्नाटक सरकारची मागणी फेटाळून लावावी, अशी अपेक्षा आहे.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर

५. छत्रपती शिवराय ‘म्लेंच्छक्षय’ असल्याची उदाहरणे

अ. छत्रपती शिवरायांचे वीर पुत्र धर्मवीर संभाजी महाराज हे त्यांच्या वडिलांविषयी ‘यौवनारंभगृहीतम्लेंच्छक्षयदीक्षा’, असे विशेषण वापरतात. या विशेषणाचा अर्थ आहे, ‘म्लेच्छांचा म्हणजे मुसलमानांचा नाश करण्याची दीक्षा तारुण्याच्या आरंभी घेतलेला.’

आ. बुंदेलखंडचा राजा छत्रसाल याने छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट घेतली होती. त्या भेटीत छत्रपती शिवराय त्याला म्हणाले, ‘छत्रसाल, तुम्ही क्षत्रियांचे मुकुटमणी. तुम्ही जाऊन स्वतःची मायभूमी जिंका. स्वदेशावर राज्य करा. तुमच्यापासून आम्ही बिलकूल निराळे नाही. मोगलांचे प्रदेश मारून जिंका. त्यांच्या दलसंहारांना देशोधडीला लावा. तुर्कांवर विश्वास बिलकूल ठेवू नका. तुम्ही सिंह आणि तुर्क गज (हत्ती) असे माना. तुर्कांच्या ठिकाणी विवेक कसा, तो कुणी पाहिलाच नाही. तुम्ही भेटीस गेला, तर ते तुम्हाला अडवतील. मला देवी भवानीचे साहाय्य आहे; म्हणून मोगलांचे भय मला बिलकूल वाटत नाही. ते कपटबलाने या देशात आले, त्यांना काढा. आमच्यावर त्यांनी उमराव पाठवले आहेत. तुर्कांवर माझी तलवार उघडलेली आहे. कीचकाप्रमाणे आपण त्यांचा संहार करावा. तुम्ही स्वदेशी जाऊन आपल्या फौजा जमवा. तुर्कांना मारण्यात तलवारी तोडून घ्या. अंत:करणात व्रजनाथ श्रीकृष्ण साठवून ठेवा आणि तलवार हातात घ्या. तोच सर्वांचे रक्षण करणारा आहे, हा निर्धार असू द्या !’ (संदर्भ : ‘शिवभूषण’, संपादक : निनाद बेडेकर, स्नेहल प्रकाशन, पुणे)

बुंदेलखंडाच्या छत्रसालाला असा उपदेश करणारे छत्रपती शिवराय स्वतःच्या सैन्यात मुसलमानांना प्रवेश देतील का ?

६. काँग्रेस पक्ष सर्वांत घातक !

काँग्रेसला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे शौर्य गाजवता येत नाही. शत्रूशी दोन हात करून स्वतःचे राष्ट्र, संस्कृती, धर्म यांच्या रक्षणार्थ लढण्याचे धाडस काँग्रेसमध्ये नाही. शत्रूला शरण जाण्यातच धन्यता मानणारी काँग्रेस छत्रपती शिवरायांसारख्या क्षात्रतेजाने तळपणार्‍या राष्ट्रपुरुषाशी एकनिष्ठ कशी राहू शकेल ? स्वतःला छत्रपती शिवरायांप्रमाणे शौर्य गाजवता येत नाही; म्हणून त्यांना सहिष्णू ठरवण्याचा घाट घालणारा हा पक्ष सर्वांत घातक आहे. छत्रपती शिवरायांना अपमानित करून मुसलमान समाजाची कृपादृष्टी प्राप्त करण्याची विकृत बुद्धी या पक्षाला वारंवार होते.

आश्चर्य वाटते ते याचे की, छत्रपती शिवरायांविषयी अनास्था बाळगणार्‍या पक्षाला मतदान करून त्या पक्षाच्या हाती सत्ता देणारे नागरिक आपल्या देशात आहेत, हीच मोठी विटंबना आहे.

७. राष्ट्रपुरुषांचा अपमान करणार्‍यांवर कठोर कारवाईसाठी कायदा हवा !

वास्तविक ‘राष्ट्रपुरुषांविषयी अनास्था बाळगणे, त्यांचा अपमान करणे, हा राष्ट्रद्रोह आहे’, असा आपल्याकडे निर्बंध नाही. आता असा निर्बंध अस्तित्वात आणून राष्ट्रपुरुषांचा अव्हेर करणार्‍या कुणाही व्यक्तीला अथवा व्यक्ती समूहाला देहांत प्रायश्चित्त देणे योग्य ठरेल. त्यामुळे छत्रपती शिवरायांसारख्या राष्ट्रपुरुषांचा अपमान करण्याचे धाडस कुणीही करू शकणार नाही, अशी भूमिका आता जनतेनेच घेऊन तशी मागणी करणे नितांत आवश्यक आहे. असे आपण केले नाही, तर हा देश सुरक्षित राहील, देशातील शांतता सुव्यवस्था अबाधित राहील, असे वाटत नाही.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली.