Odisha Durga Immersion Attack : कटक (ओडिशा) येथे दुर्गापूजा विसर्जन मिरवणुकीवर मुसलमानांची दगडफेक !

  • दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ

  • पोलीस आणि अग्नीशमन दलाचे अधिकारी यांच्यावरही दगडफेक

  • २५ जण घायाळ

कटक (ओडिशा) – येथे ५ ऑक्टोबरच्या रात्री उशिरा दुर्गापूजा विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. कटकच्या दरागाबाजार या मुसलमानबहुल परिसरातून देविगरा येथील नदीकाठाच्या दिशेने विसर्जन मिरवणूक निघाली होती. उत्तररात्री दीड वाजता हाती पोखरी परिसरात हिंसाचार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिरवणुकीच्या वेळी मोठ्या आवाजात लावण्यात आलेल्या संगीताला मुसलमानांनी आक्षेप घेतला. मुसलमानांनी छतावरून दगड आणि बाटल्या फेकल्या. घायाळांमध्ये पोलीस उपअधीक्षक ऋषिकेश ज्ञानदेव यांचाही समावेश आहे. पोलीस अधिकार्‍यांनी संपूर्ण शहरात संचारबंदी लागू केली आहे. येथील इंटरनेट सेवाही बंद आहेत. हिंसाचारात २५ लोक घायाळ झाले. आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

१. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. या वेळी अनेक वाहने आणि दुकाने यांची तोडफोड करण्यात आली.

२. विश्व हिंदु परिषदेने ६ ऑक्टोबरला बंद पुकारला. वारंवार विनंती करूनही प्रशासन विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यात अपयशी ठरले, असा आरोप विहिंपच्या प्रक्त्याने केला.

३. शहरातील गौरीशंकर पार्कजवळ अनेक ठिकाणी दंगलखोरांनी आगी लावल्या. अग्नीशमन दलाच्या अधिकार्‍यांवरही दगडफेक करण्यात आली.

दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री माझी यांचे आश्वासन !

मुख्यमंत्री मोहन चरण माझी म्हणाले की, समाजविरोधी घटकांवर जातीय सलोखा बिघडवण्याचा आरोप आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

संपादकीय भूमिका 

हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर दगडफेक व्हायला कटक हे भारतात आहे कि पाकिस्तानात ? हिंदू अल्पसंख्य असलेला पाकिस्तान, बांगलादेश असो कि हिंदू बहुसंख्य असलेला भारत असो, हिंदूंच्या उत्सवांवर सर्वत्र आक्रमणे केली जातात. ही स्थिती हिंदूंना लज्जास्पद !