‘अवामी ॲक्शन कमिटी’ या संघटनेच्या नेतृत्वाखाली सहस्रावधी नागरिकांनी आरंभले आंदोलन

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिवसेंदिवस पाकिस्तानी सरकारच्या विरोधातील रोष वाढत आहे. पुष्कळ प्रसिद्धी मिळालेल्या ‘अवामी ॲक्शन कमिटी’ने २९ सप्टेंबरच्या सकाळी संपूर्ण प्रदेशात मोठ्या प्रमाणात आंदोलनांना आरंभ केला आहे. याचा सामना करण्यासाठी पाकिस्तानच्या सुरक्षादलांनी तेथे सैनिकांना मोठ्या प्रमाणात तैनात केले आहे. मध्यरात्रीपासूनच इंटरनेट बंद करण्यात आले आहे.
⚡ Rebellion erupts in PoK under the leadership of Awami Action Committee
👥 People rise against Islamabad’s oppression
🚔 Thousands of soldiers rushed from Punjab to crush the movement
📢 Proof yet again: Pakistan silences its own citizens with force instead of listening to… pic.twitter.com/swnJJWHGYl
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 30, 2025
अधिकार न मिळाल्याने आंदोलन !
मुझफ्फराबादमध्ये जमावाला संबोधित करतांना ‘अवामी ॲक्शन कमिटी’चे नेते शौकत नवाज मीर म्हणाले की, आपले आंदोलन कोणत्याही संस्थेविरुद्ध नाही, तर जे मूलभूत अधिकार आपल्याला ७० वर्षांपासून मिळाले नाहीत, ते मिळवण्यासाठी आहे.
अशा आंदोलनांचा सामना करण्यासाठी शस्त्रांनी सुसज्ज पाकिस्तानी सुरक्षादलांनी पाकव्याप्त काश्मीरच्या प्रमुख शहरांमध्ये पथसंचलन केले. पंजाब प्रांतातून सहस्रावधी सैनिक तैनात करण्यात आले आहेत. (पाकचे सरकार हे कशा प्रकारे तिच्याच जनतेचा आवाज दाबण्यासाठी दडपशाही करत आहे, त्याचेच हे उदाहरण ! – संपादक)
पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेच्या समस्या !
पाकव्याप्त काश्मीरची जनता वाढत्या महागाईमुळे त्रस्त आहे. पिठापासून वीज अशा सर्वांचे दर गगनाला भिडले आहेत. स्थानिक लोक आता भारतीय काश्मीरमध्ये मिळणार्या सुविधांशी तुलना करू लागले आहेत. ‘आपली वाईट स्थिती पाकिस्तानमुळे झाली’, यावर ते आता ठामपणे त्यांची भूमिका मांडू लागले आहेत.
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले