
१. देवीला प्रार्थना केल्यावर यज्ञाच्या वेळी होणारे त्रास न्यून होऊन चैतन्य ग्रहण करता येणे
‘१०.१.२०२१ या दिवशी बगलामुखी यज्ञ चालू झाल्यावर माझ्या हाता-पायाच्या तळव्यांत आणि डोळ्यांत उष्णता निर्माण झाली. त्या वेळी मी देवीला प्रार्थना केली, ‘मला वेगवेगळ्या ठिकाणी त्रास होत आहेत, त्याचे तू निवारण कर. मला यज्ञातील चैतन्य ग्रहण करतायेऊ दे.’ त्यानंतर १० मिनिटांनी माझी सर्व उष्णता हळूहळू न्यून होत गेली आणि मला शांतपणे यज्ञातील चैतन्य ग्रहण करता आले.

२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आरती करत असतांना देवीचे दहा हात दिसू लागणे, सूक्ष्म परीक्षण करणार्या कु. मधुराताईंना याचे कारण विचारताच ‘देवी तारक-मारक शक्ती देत आहे’, असे त्यांनी सांगणे
११.१.२०२१ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आरती करत असतांना यज्ञाच्या वेळी देवीचे दहा हात दिसले. तेव्हा मी कु. मधुरा भोसले यांना ही अनुभूती सांगितली. मधुराताई म्हणाली, ‘‘आज बगलामुखीदेवी पुष्कळ युद्ध करत आहे; म्हणून तुम्हाला अशी अनुभूती आली. देवी तारक-मारक शक्ती देत आहे.’’
३. १३.१.२०२१ या दिवशी सद्गुरु गाडगीळकाका तुपाची आहुती देत असतांना तुपाच्या पात्रात मोठी काळी बाहुली दिसली आणि यज्ञकुंडात काळे साप अन् प्राणी यांची आकृती दिसली.
४. यज्ञ चालू असतांना इतर वेळी पू. वामन शांत बसत असले, तरी आज ते संत बसले होते, तिकडे ये-जा करत असल्यामुळे वातावरणात आनंद जाणवणे, तसेच प.पू. दास महाराज आल्यामुळे अधिक प्रमाणात शक्ती जाणवणे
१४.१.२०२१ या दिवशी यज्ञाच्या ठिकाणी पू. वामन (सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर) आले होते. ते नेहमी एकाच जागेवर शांत बसलेले असतात; पण आज ते इकडे तिकडे आणि संत बसलेले होते तिकडे ये-जा करत होते. त्यामुळे ‘वातावरणात आनंद’ जाणवत होता. तसेच प.पू. दास महाराज यज्ञाच्या ठिकाणी आले होते, तेव्हा पुष्कळ प्रमाणात शक्ती जाणवत होती. ते पू. वामन यांच्याशी बोलत होते, त्या वेळी माझ्याकडे बघून त्यांनी स्मित हास्य केले.’
– सौ. वैशाली मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
साधकाची नेमकी अडचण जाणून त्यावर अचूक उपाययोजना सांगून त्याला घडवणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !