|

मैसुरू (कर्नाटक) : ज्यांना दसरा आणि आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख नाही, त्यांनीच बानू मुश्ताक यांना विरोध केला. इतिहास विकृत करून स्वार्थासाठी राजकारण करणे अक्षम्य गुन्हा आहे. राजकारण करायचेच असेल, तर निवडणुकीत करूया. सणासुदीच्या निमित्ताने खालच्या पातळीचे राजकारण करणे ही क्षुल्लक गोष्ट आहे, असे वक्तव्य येथील दसरा महोत्सवाचे हिंदुद्वेषी लेखिका बानू मुश्ताक यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या भाषणात केले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढे म्हणाले की,
१. राज्यातील बहुसंख्य समाजाने बानू मुश्ताक यांनी दसर्याचे उद्घाटन केल्याचे स्वागत केले, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. (बहुसंख्यकच नव्हे, तर मुसलमानांनीही याचा उघड विरोध करून त्याला हराम (इस्लामनुसार अयोग्य) असल्याचे म्हटले असतांना ती वस्तूस्थिती नाकारून सिद्धरामय्या कुणाला खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत ? – संपादक)
२. बानू मुश्ताक या एक मुसलमान महिला असण्यापेक्षा त्या माणूस म्हणून माणुसकीची मूल्ये पाळणार्या व्यक्ती आहेत.
३. राज्यघटनेतील सहिष्णुतेची मूल्ये पाळणारेच खरे भारतीय आहेत. (भारतात सहिष्णु कोण आहेत हे सर्वज्ञात आहे ! – संपादक )आपली राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे.
संपादकीय भूमिका
|
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन