|

मंड्या (कर्नाटक), १९ सप्टेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील मद्दूरू येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या वेळी घडलेल्या दगडफेकीच्या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त करून हिंदूंना धीर देण्यासाठी श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक तेथे जाणार होते. तथापि, ‘हिंदुविरोधी राज्य सरकारने मला मद्दूरूत प्रवेश न देण्याचा निषेध आदेश काढला आहे’, अशी माहिती मुतालिक यांनी ‘एक्स’द्वारे दिली. यामध्ये त्यांनी पोलिसांचा ३ पानांचा आदेशही जोडला आहे.
🚨 Maddur, Karnataka:
Police stop Shri Ram Sena chief Pramod Mutalik (@PramodMuta39880) from entering the city, citing “threat to social harmony.”👉 This comes after stone-pelting from a mosque during idol immersion in Maddur.
Is this Karnataka or Pakistan?
Or are… https://t.co/s464Hcy4Yf pic.twitter.com/qvkyUiCtFL
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 19, 2025
या आदेशातील महत्त्वाची सूत्रे अशी !
१. सध्या मद्दूरू शहर शांत असून योग्य पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक, हे १९ सप्टेंबरला तेथे जाणार असल्याचे समजले.
२. मुतालिक हे हिंदु धर्माचे कट्टर समर्थक असून चिथावणीखोर आणि जातीय तेढ निर्माण करणारी भाषणे देण्यासाठी ते ओळखले जातात.
३. त्यांच्यावर कर्नाटकातील विविध जिल्ह्यांमध्ये ३० हून अधिक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. (आदेशाच्या प्रतीत गुन्हा क्रमांक, जिल्हा पोलीस ठाणे आदी माहिती देऊन गुन्ह्यांची संपूर्ण सूचीच देण्यात आली आहे.)
४. यातून हे स्पष्ट होते की, त्यांचा स्वभाव सामाजिक सलोखा बिघडवणारा आहे.
🚨 Maddur, Karnataka:
Police stop Shri Ram Sena chief Pramod Mutalik (@PramodMuta39880) from entering the city, citing “threat to social harmony.”👉 This comes after stone-pelting from a mosque during idol immersion in Maddur.
Is this Karnataka or Pakistan?
Or are… https://t.co/s464Hcy4Yf pic.twitter.com/qvkyUiCtFL
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 19, 2025
‘सनातन प्रभात’चा मुतालिक यांच्याशी संवाद : मुतालिक यांनी सर्व आरोपांचे केले रोखठोक खंडन !यासंदर्भात ‘सनातन प्रभात’ने श्री. मुतालिक यांच्याशी संवाद साधला असता, ते म्हणाले की, मद्दूरू येथे ५०० हिंदु कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. आम्ही अधिवक्त्यांना घेऊन त्यांना कायदेशीर साहाय्य करण्यासाठी जाणार होतो. तेथे कोणतेही आंदोलन, मिरवणूक, सभा काहीच आयोजित करण्यात आले नव्हते. असे असूनही कांग्रेस हिंदुविरोधी नीती पुन:पुन्हा दाखवीत आहे. या नीतीचा मी निषेध करतो. मुतालिक यांना त्यांच्यावर प्रविष्ट गुन्ह्यांच्या सूचीविषयी विचारले असता, ते म्हणाले की, ती सर्वची सर्व सूचीच खोटी आहे. त्या सर्व गुन्ह्यांच्या संदर्भात न्यायालयाने मला निर्दोष सोडले आहे. त्यामुळे असा आदेश काढून माझी फसवणूक केली जात आहे. |
आमच्या स्वातंत्र्याचे हरण ! – मुतालिक
आम्हाला रोखण्याऐवजी दगडफेक करणार्यांना, पॅलेस्टाईनचा ध्वज घेऊन फिरणार्यांना आणि ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणणार्यांना रोखायला हवे, हे सोडून शांतीप्रिय लोकांना धीर देण्यासाठी जाणार्या आमच्यासारख्या श्रीराम सेनेला रोखणे म्हणजे स्वतांत्र्याचे हरणच आहे. डॉ. आंबेडकर यांचा हा अपमान आहे. हे घटनाविरोधी आहे, अशी प्रतिक्रियाही श्री. प्रमोद मुतालिक यांनी ‘सनातन प्रभात’कडे व्यक्त केली.
संपादकीय भूमिकाहिंदुत्वनिष्ठ नेत्यांना बहुसंख्यांक हिंदूंच्या देशातच एका शहरात जाण्यापासून बंदी घालणे, यासाठी कर्नाटक राज्य भारतात आहे कि पाकिस्तानात ? कि असे म्हणायचे की, काँग्रेसची सत्ता असलेली भारतातील संबंधित राज्ये ही इस्लामी पाकिस्तान अथवा बांगलादेश यांच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत ? |
खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
विधानभवनाच्या वाहनतळात बेवारसपणे पडून आहेत १५ हून अधिक वाहने !
साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा !
श्री चांगदेव महाराजांच्या मंदिरात धर्मांधांकडून अतिक्रमण !
घरावर आलेल्या फांद्या पालिकेने सांगूनही न हटवल्याने त्या काढण्याच्या प्रयत्नात महिलेचा मृत्यू