साधिकेची मातृभाषा मराठी नसूनही तिला मराठी भाषेतील सात्त्विकतेची आलेली प्रचीती !

१. मराठी भाषेतील लिखाण भरभर वाचता येत नसल्यामुळे ‘इंग्रजी भाषेतील दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचायला मिळाले, तर बरे होईल’, असे वाटणे 

‘माझा व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्‍या साधकांनी ‘प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचायला हवे’, असे सांगितले होते. नंतर गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने मी अधून-मधून मराठी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचण्याचा प्रयत्न करत होते. माझी मातृभाषा मराठी नाही. मला मराठी भाषेतील लिखाण भरभर वाचता येत नसल्यामुळे माझ्याकडून दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करण्यात चालढकलपणा होत होता. ‘इंग्रजी भाषेतील दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचायला मिळाले, तर बरे होईल’, असे मला वाटत होते.

२. एका साधिकेने इंग्रजी भाषेतील लेख वाचायला देणे

रेणू गोपलानी

नंतर एका साधिकेशी, जिच्याकडे दैनिक ‘सनातन प्रभात’मधील मराठी भाषेतील लेखांचे इंग्रजी भाषेत भाषांतर करण्याची सेवा आहे, तिच्याशी माझे बोलणे झाले. तिने मला इंग्रजी भाषेतील लेख पाठवले. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. ते इंग्रजी भाषेतील लेख वाचत असतांना माझी भावजागृती होत नव्हती.

३. मराठी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचत असतांना त्यातील सूत्रे अंतर्मनात जाणे आणि भावजागृती होणे 

मराठी भाषेतील लेख वाचत असतांना मला जरी वेळ लागत असला, तरीही मला आनंद मिळत होता. मी मराठी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचत असतांना त्यातील सूत्रे माझ्या अंतर्मनात जात होती आणि माझी भावजागृतीही होत होती’, असे माझ्या लक्षात आले.’

– रेणू गोपलानी (वय ६४ वर्षे ), पुणे (१२.६.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक