‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पितरांपासून व्यक्तीला होणारे त्रास दूर होणे आणि पितरांना पुढील गती मिळणे’, यांसाठी दत्तगुरूंचा नामजप करण्याचे महत्त्व वेळोवेळी सांगितले आहे. यासाठी सनातनच्या वतीने पितृपक्षात (८ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२५ या काळात) प्रतिदिन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’, हा नामजप न्यूनतम १ घंटा करण्यास सांगितला आहे.
१. ‘साक्षात् दत्तगुरु समोर उभे आहेत’, असा भाव ठेवून नामजप करणे
७.९.२०२५ या दिवशी हा नामजप करण्यापूर्वी ‘साक्षात् दत्तगुरु माझ्यासमोर उभे आहेत’, असा भाव ठेवून मी नामजप करण्यास प्रारंभ केला. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘या नामजपाचा आमच्या पितरांवर काय परिणाम होतो ?’, हे सूक्ष्मातून पाहूया.’
२. ‘पितरांवर नामजपाचा काय परिणाम होतो ?’, याचे सूक्ष्म परीक्षण करतांना गुरुकृपेमुळे जाणवलेली सूत्रे

अ. दत्तगुरूंचा नामजप करतांना प्रारंभी मला सूक्ष्मातून ‘आमचे १० ते १५ पितर एका गटात उभे आहेत’, असे दृश्य दिसले. त्यांतील बहुतेक पुरुषांचा पोषाख ‘पांढरे धोतर, पांढरा सदरा आणि डोक्यावर फेटा’, असा होता, तर स्त्रियांनी नऊवारी साडी नेसली होती. तेथे ४ – ५ वर्षांचे एक लहान मूलही दिसले.
आ. नंतर ‘आमच्या पितरांपैकी एका पितराने ओंजळीने पाणी पितांना दोन्ही हात करतात, तसे हात करून काहीतरी भक्षण करण्याची कृती केली’, असे दृश्य मला सूक्ष्मातून दिसले. त्या वेळी ‘मी करत असलेल्या नामजपातील शक्ती ते पितर ग्रहण करत आहेत’, असे मला जाणवले.
इ. दत्तगुरूंच्या नामजपाच्या शक्तीमुळे एका पितराभोवती पांढरे सुरक्षाकवच निर्माण झालेले दिसले. सूक्ष्म लोकांत अनिष्ट शक्ती पितरांना त्रास देऊ शकतात. त्यांच्यापासून रक्षण व्हावे, यासाठी त्या पितराभोवती सुरक्षाकवच निर्माण झाले.
ई. एक पितर तटस्थपणे उभे असलेले दिसले. त्यांना ‘दत्तगुरूंचा नामजप आणि स्वतःला पुढील गती मिळणे’, यांत काही स्वारस्य नव्हते.
उ. ज्याप्रमाणे व्यक्तीला कडक ऊन सहन न झाल्यास ती भोवळ येऊन खाली पडते, त्याप्रमाणे एक पितर अकस्मात् खाली कोसळतांना दिसले. तेव्हा ‘त्या पितरांना दत्तगुरूंच्या नामजपातील शक्ती सहन न झाल्याचे हे दर्शक आहे’, असे मला जाणवले.
ऊ. एक पितर मुक्ती मिळण्यासाठी हात जोडून दत्तगुरूंकडे याचना करतांना दिसले.
३. नामजपाचा ‘सूक्ष्मातून स्वतःवर काय परिणाम होतो ?’, असा विचार मनात आल्यावर ‘शरिरातील काळे कण नष्ट होऊन पिवळ्या दैवी कणांची निर्मिती होत आहे’, असे दिसणे
दत्तगुरूंच्या नामजपाचा ‘सूक्ष्मातून स्वतःवर काय परिणाम होतो ?’, असा विचार माझ्या मनात आला. तेव्हा माझ्या शरिरात पितृदोषाशी संबंधित काळे कण दिसले. दत्तगुरूंचा भावपूर्ण नामजप केल्यावर माझ्या शरिरात पिवळ्या दैवी कणांची निर्मिती होऊ लागली. या दैवी कणांमुळे ते काळे कण नष्ट होऊ लागले. यातून ‘या नामाद्वारे पितृदोष न्यून होतो’, हे माझ्या लक्षात आले .
कृतज्ञता : वरील सूक्ष्म परीक्षणाद्वारे मला ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी दत्तगुरूंविषयी केलेले मार्गदर्शन आणि ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’ हा नामजप’, यांचे महत्त्व समजले. याबद्दल मी परात्पर गुरु डॉक्टर आणि दत्तगुरु यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.९.२०२५)
| • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |

उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !