
देहली – नुकतेच स्थापन झालेल्या ‘परप्लेक्सिटी एआय’ या शोध इंजिनच्या विज्ञापनात भारताचे चुकीचे मानचित्र (नकाशा) वापरले आहे. या मानचित्रातून पाकव्याप्त काश्मीर हा महत्त्वाचा भाग वगळण्यात आला आहे. हे विज्ञापन हिंदीमध्ये असून भारतात प्रसारित करण्यात आले आहे. त्यामुळे भारतियांकडून सामाजिक माध्यमांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. ‘परप्लेक्सिटी एआय’ तंत्रज्ञान क्षेत्रातील आस्थापन असून ते अमेरिकेत स्थापन झाले आहे. हे ॲप संवादात्मक शोध इंजिन असून गुगलप्रमाणे वापरले जाते.
🇺🇸 US-based Perplexity AI sparks outrage!
📍 Hindi ad shows India’s map without PoK
🔥 Social media erupts, demands action
🔎 Platform is a conversational search engine, Google-like
⚠️ Foreign firms repeatedly insult India’s sovereignty by distorting maps. Time for Govt to… pic.twitter.com/HpaXhhcoIr
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 17, 2025
१. भारतीय कायद्यानुसार भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखवणे दंडनीय अपराध आहे. भारताने अनेक वेळा स्पष्ट केले आहे की, जम्मू-काश्मीर आणि लडाख यांच्या काही भागावर पाकिस्तान आणि चीन यांनी काही दशकांपासून अवैध स्वरूपात ताबा मिळवला असला, तरी ते भारताचे अभिन्न अंग आहेत आणि नेहमीच रहातील.
२. असे असले, तरी अनेक वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकव्याप्त काश्मीर वगळून भारताचा नकाशा दाखवला जातो.
३. यापूर्वी चीन आधारित ‘अब्लो’ ॲपमध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले होते, तसेच लक्षद्वीपला दाखवण्यात आले नव्हते.
४. त्याविरोधात जनक्षोभ झाल्याने हे ॲप ‘प्ले स्टोर’ वरून हटवण्याविषयी भारत सरकारने गुगलला निर्देश दिले होते.
| ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या राष्ट्रीय भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक |
संपादकीय भूमिकाविदेशी आस्थापने हेतूपुरस्सर भारताचे चुकीचे मानचित्र प्रसारित करून देशाची राष्ट्रीय अस्मिता दुखावतात ! अशा आस्थापनांवर सरकारने कारवाई करणे आवश्यक ! |
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan