बलिया (उत्तरप्रदेश) येथील घटना
(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)
बलिया (उत्तरप्रदेश) – येथील जमीन पडसरा गावात मौलाना शहाबुद्दीन याला अटक करण्यात आली आहे. आरोपी मौलानाने भारताच्या तिरंग्यावर प्रश्न उपस्थित करत लोकांना इस्लामचा ध्वज फडकावण्याचा सल्ला दिला होता. त्याच्यावर हिंदुत्व आणि आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विरोधात भाषण केल्याचाही आरोप आहे. मौलानाच्या अटकेनंतर शेकडो मुसलमानांनी त्याच्या सुटकेसाठी पोलीसठाण्याबाहेर गर्दी केली. (आरोपी मौलानाच्या सुटकेसाठी पोलिसांवर दबाव आणणार्या मुसलमानांच्या विरोधातही गुन्हा नोंदवून कारवाई केली पाहिजे, जेणेकरून ते कायदा हातात घेण्यास धजावणार नाही ! – संपादक)
मौलाना शहाबुद्दीन याने बारावफातच्या मिरवणुकीच्या वेळी जामा मशिदीत भाषण करतांना संघ आणि हिंदुत्व यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याने म्हटले की, अर्धी चड्डी आणि अर्धा पायजमा घालणारे इस्लाम अन् देशाचे विश्वासघातकी आहेत. मौलानाने पुढे असेही म्हटले की, हिंदू त्यांची विचारधारा पसरवण्यासाठी झेंडे लावतात, मुसलमानांनीही इस्लामचा झेंडा लावला पाहिजे. त्याने भारताच्या तिरंग्यावर प्रश्न उपस्थित करत थेट इस्लामचा झेंडा फडकावण्याचे आवाहन केले होते.
या भाषणाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात पसरला. त्यानंतर विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार प्रविष्ट (दाखल) करून मौलानाच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली. नगरा पोलीस ठाण्याचे प्रभारी अजयकुमार त्रिपाठी यांनी सांगितले की व्हिडिओची पडताळणी केली जात आहे.
संपादकीय भूमिकायावरून मुलमानांना देशापेक्षा धर्म नेहमी मोठा वाटतो, हेच सिद्ध होते. मौलानाच्या या सल्ल्याला कुठलाही मुसलमान, काँग्रेसवाले, निधर्मीवादी आदी विराध करत नाहीत, हे लक्षात घ्या ! |

५ जून : पू. गोळवलकर गुरुजी यांचे पुण्यस्मरण (दिनांकानुसार)
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले