|

तेल अविव – हमास या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर ७ ऑक्टोबरला केलेले आक्रमण हे अमेरिकेतील ९/११ च्या (११ सप्टेंबर २००१ या दिवशी अल कायदाने अमेरिकेवर केलेले आक्रमण) आक्रमणाप्रमाणेच होते आणि आम्हीही तेच केले, जे अमेरिकेने अल् कायदा आणि ओसामा बिन लादेन यांच्या संदर्भात केले, असे विधान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केले. इस्रायलने कतारची राजधानी दोहा येथे हमासच्या राजकीय नेतृत्वावर करण्यात आलेल्या हवाई आक्रमणाचे समर्थन करत कतारला ‘हमास’चे समर्थन न करण्याची चेतावणी दिली. ‘आतंकवाद्यांना संरक्षण देणार्या देशांनी त्यांना बाहेर हाकलावे, अन्यथा त्या आतंकवाद्यांवर इस्रायल स्वतः कारवाई करेल’, अशी चेतावणीही नेतन्याहू यांनी दिली.
🚨 “We did against Hamas what the 🇺🇸 US did to al-Qaeda,” – 🇮🇱Israeli PM Netanyahu, equating Hamas attack to 9/11 and defending Israel’s strikes.
He even warned 🇶🇦 Qatar to cut off or expel Hamas leaders.
🇮🇳 Enough talk. Indians want Pakistan’s terror infrastructure crippled,… pic.twitter.com/jME8tQ4YOe
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 12, 2025
नेतान्याहू म्हणाले की,
९/११ नंतर अमेरिकेने केलेल्या कारवाईचे जगाने कौतुक केले. मग आता आमच्यावर टीका का केली जात आहे ? आंतरराष्ट्रीय समुदायाची ही भूमिका दुटप्पी आहे. आम्ही इस्रायलचा अधिकार आणि स्वसंरक्षण यांसाठी ही कारवाई केली.
संपादकीय भूमिकाआता भारतानेही पाकिस्तानला नष्ट करून सर्व आतंकवादी आणि त्यांच्या संघटना यांचा निःपात करावा, अशी भारतियांची अपेक्षा आहे ! |
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !