१० सप्टेंबरला प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘पू. वामन राजंदेकर यांच्यातील पंचतत्त्वांचे प्रमाण आणि त्यामुळे त्यांच्यात कार्यरत गुणवैशिष्ट्ये, त्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना आलेल्या अनुभूती आपण पाहिल्या. आज पू. वामन राजंदेकर यांच्या विविध जन्मांचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेऊया.
(भाग ३)
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/954871.html

६. पू. वामन राजंदेकर यांच्या विविध जन्मांचे आध्यात्मिक महत्त्व !

टीप १ – १. थोर ऋषि वामदेव : ‘वामदेव ऋषि हे पराशर ऋषींचे मित्र आणि गणेशोपासक ऋषि होते. त्यांची मैत्री देवगुरु बृहस्पती यांच्याशी होती आणि ते सदेह स्वर्गलोकातही जात असत. तेथे ते इंद्रसभेत उपस्थित राहून इंद्राला धर्माचरण आणि साधना यांच्या संदर्भात मार्गदर्शन करत असत. त्यांचा जन्म त्रेतायुगात झाला होता आणि ते द्वापरयुगातही कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी देहत्याग केला.’ (संदर्भ – सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान)
टीप २ – पू. वामन जन्मतःच संत असल्यामुळे त्यांच्या जन्मापूर्वी आणि त्यांच्या जन्मानंतर त्यांचे दर्शन घेण्यासाठी विविध पुण्यात्मे, सिद्धयोगी आणि देवदेवता सूक्ष्म रूपात किंवा फुलपाखरे किंवा पशूपक्षी यांच्या स्वरूपात येतात अन् त्यांच्या चरणांवर सूक्ष्मातून फुले वाहून जातात. ते जेव्हा पू. वामन यांना भेटतात, तेव्हा पू. वामन यांच्या देहावर, तसेच त्यांच्या आजूबाजूला पुष्कळ प्रमाणात सोनेरी, चंदेरी आणि रंगीबेरंगी दैवी कण मिळतात अन् त्यांच्याभोवती नेहमी दैवी सुगंधही दरवळत असतो.
(क्रमशः)
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक १.८.२०२५)
| • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/955619.html

हिंदूंनो, ‘लव्ह जिहाद’ला त्याच भाषेत तोंड देण्याचा विचार कदापि करू नका !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी निर्मिलेला साधनामार्ग गुरुकृपायोग !
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे ग्रंथलिखाण आणि सनातनच्या काही साधकांना मिळणारे सूक्ष्म ज्ञान यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे सूक्ष्म ज्ञानातून उलगडलेले आध्यात्मिक विश्लेषण !
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !