४ सप्टेंबरला प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘पू. वामन राजंदेकर हे श्रीविष्णूच्या हातातील कौमुदी गदेचे अंश-अवतार आहे’ आदी सूत्रे आपण पाहिली. या लेखात आपण त्यांच्यातील पंचतत्त्वांचे प्रमाण आणि त्यामुळे त्यांच्यात कार्यरत गुणवैशिष्ट्ये, त्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना आलेल्या अनुभूती पहाणार आहोत.
(भाग २)
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/952830.html

४. पू. वामन यांच्यातील पंचतत्त्वांचे प्रमाण आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये कार्यरत झालेली दैवी गुणवैशिष्ट्ये अन् त्यामुळे साधकांना येणार्या विविध अनुभूती !
ऋषिलोक – म्हणजे महर्लाेक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक
टीप – पू. वामन यांचे मुख हे अग्निस्वरूप झाले असणे : पू. वामन हे मागील जन्मातील थोर तपस्वी ऋषि असल्यामुळे विराट पुरुषाप्रमाणे त्यांचे मुख हे अग्निस्वरूप झाले आहे. त्यामुळे त्यांनी ग्रहण केलेले अन्न आणि जल यांच्यामुळे त्यांच्या मुखात एक प्रकारचा अग्निहोत्र होम होत आहे. त्यामुळे त्यांनी ग्रहण केलेले अन्न आणि जल हे मुखातील अग्नीमध्ये आहुतीच्या स्वरूपात अर्पण होऊन त्यांचे हविष्य (हवनासाठी योग्य सामग्री) विविध देवतांपर्यंत पोचते. यावरून संतांचे मुख यज्ञकुंडाप्रमाणे पवित्र स्थान असल्याची सत्यता पू. वामन यांच्या उदाहरणातून होते.’
५. पू. वामन यांच्या संपर्कात असलेल्या सात्त्विक जिवांना येणार्या अनुभूती
५ अ. सौ. मानसी राजंदेकर (पू. वामन यांची आई)

५ अ १. पू. वामन यांच्या देहाला जन्मापासूनच विविध दैवी गंध येणे : पू. वामन यांच्या देहाला जन्मापासूनच विविध दैवी गंध येतात. त्यांच्या मानेला कधी चंदनाचा, तर कधी वेगळ्याच प्रकारचा गोडसर (तुळशीच्या मंजिरीसारखा) गंध येतो. त्यांच्या केसांना बर्याच वेळा यज्ञाच्या विभूतीप्रमाणे गंध येतो. तसेच त्यांच्या नाभीजवळ काही वेळा गुलाबाचा, तर काही वेळा चंदनाचा गंध येत असतो. पू. वामन यांना येणार्या घामालासुद्धा गोडसर गंध असतो. त्यांच्यामधील या गंधांमुळे माझ्यावरचे आवरण दूर होऊन मला हलकेपणा जाणवतो. एकूणच पू. वामन यांच्याकडून स्थितीच्या आवश्यकतेप्रमाणे दैवी गंध येतो.
५ अ २. पू. वामन ब्राह्ममुहूर्तावर उठले की, पू. वामन आणि त्यांची आई यांच्याभोवती पुष्कळ गारवा निर्माण होणे : पू. वामन रात्री माझ्या जवळच झोपतात, तसेच त्यांना जन्मापासूनच मध्यरात्री ३.३० ते पहाटे ५.०० या वेळेत जाग येत असे. ते लहान असतांना या वेळेत उठायचे. आता या वेळेत ‘ते गाढ झोपलेले नसून जागृत अवस्थेत आहेत’, असे जाणवते. या वेळेत मला अकस्मात् पुष्कळ थंडी वाजल्याप्रमाणे होते. त्या वेळी आमच्याभोवती (पू. वामन आणि मी यांच्याभोवती) पुष्कळ गारवा निर्माण होतो.
५ अ ३. तेजतत्त्वाच्या अनुभूती

अ. पू. वामन यांच्या जन्मापासूनच त्यांच्याभोवती पिवळ्या-निळ्या रंगाचे वलय असल्याचे जाणवते.
आ. रात्री खोलीत कितीही अंधार असला, तरी पू. वामन यांच्याभोवती सतत प्रकाश दिसतो. त्यामुळे रात्री झोपतांना डोळे बंद केल्यावर मला नेहमी ‘खोलीतील दिवे चालूच आहेत’, असे वाटते.
इ. काही वेळा बंद डोळ्यांसमोर येणारा प्रकाश डोळे दिपवणारा असतो.
ई. जेव्हा आम्ही प्रवासात असतो, तेव्हा पू. वामन यांच्याभोवती पिवळ्या प्रकाशासह निळ्या रंगाची गतिमान प्रभावळ फिरतांना दिसते.
उ. पू. वामन यांच्याभोवती असलेले हे वलय कधी गतिमान असते, तर कधी स्थिर असते.
ऊ. सूक्ष्मातील युद्ध वाढल्यास त्यांच्याभोवती अग्नीच्या ज्वालांप्रमाणे गरम वातावरण निर्माण होते.
ए. पू. वामन यांच्या शरिराचे तापमान नेहमीच अधिक असते. त्यांना खोलीतील पंखा, वातानुकूलीत यंत्र (१८ डिग्री) चालू असले, तरी पुष्कळ घाम येतो.
ऐ. त्यांना नेहमी उष्णतेमुळे ‘तोंड येणे’ हा त्रास होतो.
ओ. रात्री झोपल्यावर त्यांची उशी कायम घामामुळे भिजलेली असते.
औ. लहानपणी त्यांना अग्निहोत्राची विभूती खायला पुष्कळ आवडायची.
अं. अपघातामुळे झालेली जखम लवकर भरून येणे : ९.५.२०२५ या दिवशी सायंकाळी पू. वामन आणि मी दुचाकीवरून जात असतांना पुष्कळ मोठा अपघात झाला. त्या वेळी पू. वामन यांच्या डोक्याला मोठी खोच पडली आणि त्यांच्या दोन्ही पायांच्या गुडघ्यांना जास्त मार लागला. त्यांचे डोके आणि पाय यांतून पुष्कळ रक्त वाहत होते. असे असूनही ते अतिशय शांत होते. त्यांच्या डोक्याला पडलेले टाके आणि पायांची जखम अतिशय अल्प काळात भरून निघाली. त्यांच्या समवेत मलाही झालेली जखम आणि पडलेले टाके लवकर भरून निघाले.
५ अ ४. वायुतत्त्वाच्या अनुभूती
अ. पू. वामन यांचे लहानपणी वजन अधिक होते; पण मला ते कधीच जाणवले नाही. अजूनही प्रवासात असतांना ते काही घंटे माझ्या मांडीवर बसून असले, तरी मला त्यांचे वजन जाणवत नाही.
आ. त्यांची त्वचा कापसाप्रमाणे आणि लोण्याप्रमाणे मऊ अन् लुसलुशीत आहे.
इ. पू. वामन आजारी असले किंवा सकाळी झोपून उठले, तरी ते सतत उत्साही (ताजेतवाने) दिसतात.
ई. त्यांच्या चैतन्यामुळे मला थकवा जाणवत नाही. काही वेळा मला बरे वाटत नसल्यास तेच मला शक्ती देत असल्याचे जाणवते.
उ. पू. वामन यांना विविध देवीदेवता प्रकाश रूपात येऊन स्पर्श करून जात असल्याचे त्यांनीच सांगितले.
ऊ. मागील काही मासांपासून मला पहाटेच जाग येऊन आपोआपच माझा नामजप चालू होत असल्याची अनुभूती येत आहे.
५ अ ५. आकाशतत्त्वाच्या अनुभूती
अ. पू. वामन समवेत असतांना काही वेळा ॐ चा नाद ऐकू येतो, तर काही वेळा शंखनाद ऐकू येतो. हे दोन्ही नाद मंद स्वरूपात ऐकू येत असतात.
आ. पू. वामन मला टेकून बसले असतील, त्या वेळी माझा नामजप आपोआप चालू होत असल्याचे जाणवते.
इ. पू. वामन यांना ‘नारायण’ हा नाद ऐकू येत असल्याचे ते सांगतात.
५ आ. श्री. अनिरूद्ध राजंदेकर (पू. वामन यांचे वडील)

५ आ १. पू. वामन यांच्या देहातून विविध दैवी गंध येणे : मी बाहेरून काम करून अथवा सेवा करून घरी आल्यावर पू. वामन माझ्या जवळ येतात आणि बराच वेळ ते माझ्या जवळ बसून असतात. त्या वेळी ‘माझ्यावर आलेले काळ्या शक्तीचे आवरण निघून जात आहे’, असे जाणवते. तसेच त्यांच्या सत्संगात असतांना मला तुळशीचा आणि चंदनाचा मंद सुगंध येतो. ‘माझ्यावर आलेल्या आवरणानुसार या गंधाचे प्रमाण अल्प-अधिक असते’, असे लक्षात येते. मी पू. वामन यांना अंघोळ घालतांना ‘त्यांच्या शरिरावर कधीच मळ आहे’, असे जाणवत नाही.
५ आ २. पू. वामन यांचा देह प्रकाशमान असणे : पू. वामन यांच्या जन्मापासूनच त्यांचा देह प्रकाशमान असल्याचे जाणवते. माझ्या एका जवळच्या मित्राने पू. वामन यांना पाहिल्यापासून ते नेहमी म्हणतात की, ‘हे आतूनच प्रकाश घेऊन आले आहेत’, असे वाटते.
५ आ ३. पू. वामन वायुप्रमाणे हलके असल्याचे जाणवणे : पू. वामन यांचे अवती भोवती असणे किंवा वावरणे हे वायुप्रमाणे हलके असते. मी संगणकावर काम अथवा सेवा करतांना ते कधी येऊन जातात, हे काही वेळा कळतसुद्धा नाही.
५ आ ४. पू. वामन माझ्या जवळ असतात, त्या वेळी माझे मन स्थिर असते.
५ इ. कु. श्रिया राजंदेकर, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के (पू. वामन यांची मोठी बहीण)

१. पू. वामन यांच्या देहाला विविध दैवी सुगंध येणे : पू. वामन यांच्या समवेत खेळतांना मला कधी चंदनाचा, तर कधी तुळशीचा गंध येतो. काही वेळा मी बाहेर जाऊन आल्यावर पू. वामन माझ्या जवळ आल्यावर मला वेगळाच दैवी सुगंध येतो. त्यामुळे माझ्यावरील आवरण न्यून होऊन मला माझा श्वास शुद्ध होत असल्याचे जाणवते.
२. मी पू. वामन यांच्याशी खेळत असतांना कधी कधी माझ्या तोंडात गोड चव निर्माण होते आणि ती पुष्कळ वेळ टिकून असते.
३. पू. वामन जेव्हा अंधारातून किंवा दिवा बंद असलेल्या खोलीतून बाहेर येतात, ‘त्या वेळी त्यांच्या देहातून पुष्कळ प्रमाणात प्रकाश बाहेर पडत आहे’, असे दिसते. पू. वामन यांचे छायाचित्र काढले असता त्यात त्यांचे डोळे पुष्कळ निळे असल्याचे जाणवते.
४. पू. वामन समवेत असतांना मला माझ्या देहाभोवती काही वेळा गारवा, तर काही वेळा उष्णता जाणवते. पू. वामन आले की, थंड वार्याची झुळूक आल्याप्रमाणे वाटते.
५. पू. वामन यांच्या बाजूला झोपल्यावर काही वेळा ॐ कार, तर काही वेळा मंद शंखनाद ऐकू येतो.’
६. धन्य होतो आम्ही पाहुनी ते देवाचे बालरूप !
मूर्ती लहान; पण कीर्ती महान ।
दिसायला सुंदर आणि छान ।। १ ।।
सात्त्विक मती आणि दिव्य कांती ।
पू. वामन यांची थोर ईश्वर भक्ती ।। २ ।।
धन्य आहे पू. वामन यांचे दिव्य स्वरूप ।
धन्य होतो आम्ही पाहुनी ते देवाचे बालरूप ।। ३ ।।
(क्रमशः)
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १.८.२०२५)
| सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/955244.html

इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
Muzaffarpur Hospital Fire : मुझफ्फरपूर (बिहार) येथे खासगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू, तर २० हून अधिक घायाळ
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !