अमेरिका आणि फ्रान्स हेही भारताचे ग्राहक
नवी देहली – संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीच्या क्षेत्रात भारताचे जगभरात वर्चस्व वाढत आहे. जगातील शंभरहून अधिक देश भारताकडून संरक्षण शस्त्रे आणि उपकरणे आयात करत आहेत. यामध्ये अमेरिका, रशिया आणि फ्रान्स यांसारख्या देशांचाही समावेश आहे. भारत सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांसाठी लढाऊ विमानांच्या सुट्या भागांचा पुरवठादारही बनला आहे. भारतात बनवलेली काही संरक्षण उपकरणे आणि शस्त्रे जगातील अनेक देशांच्या सैन्यात खूप लोकप्रिय होत आहेत.
१. भारत ज्या देशांमध्ये संरक्षण उपकरणे आणि शस्त्रे पुरवत आहे, त्यामध्ये अमेरिका, फ्रान्स आणि आर्मेनिया आघाडीवर आहेत.
२. फ्रान्स भारताकडून विविध प्रकारचे सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे आयात करत आहे. ही उपकरणे अत्याधुनिक लढाऊ विमानांमध्ये आणि इतर संरक्षण उत्पादनांमध्ये वापरली जातात.
३. भारतात बनवलेल्या संरक्षण उत्पादनांच्या वाढत्या मागणीमुळे भारताची संरक्षण निर्यात केवळ ९ वर्षांत १५ पटींनी वाढली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये ती २३ सहस्र ६२२ कोटी रुपयांपर्यंत पोचली आहे. वर्ष २०२९ पर्यंत संरक्षण निर्यात ५० सहस्र कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
४. मागील १० वर्षांत भारताच्या अर्थसंकल्पात संरक्षणक्षेत्रासाठी निधी उपलब्ध करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. वर्ष २०१३-१४ मध्ये भारताच्या अर्थसंकल्पात २ लाख ५३ सहस्र ३४६ रुपयांच्या निधीचे संरक्षणक्षेत्रासाठी प्रावधान होते. वर्ष २०२४-२५ मध्ये ते वाढून ६ लाख ५३ सहस्र ३४६ कोटी रुपये एवढे झाले आहे.

मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
संपादकीय : हिंदू जात्यात !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
CJI In London: लंडन येथे भारताच्या सरन्यायाधिशांच्या कार्यक्रमात गोंधळ : भारतीय उच्चायुक्तालयाचा तीव्र संताप
Putin Praises India : भारतीय हे जगातील सर्वांत प्रतिभावान लोकांपैकी एक आहेत ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया
इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेची मोठ्या प्रमाणात हानी ! – Donald Trump