पंतप्रधान मोदी यांचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांना आवाहन

नवी देहली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व खासदारांना देशभरात ‘स्वदेशी मेळा’ आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. या माध्यमातून ‘मेड-इन-इंडिया’ उत्पादनांना चालना मिळेल आणि लोक ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाशी जोडले जाऊ शकेल. पंतप्रधान म्हणाले की, खासदारांनी त्यांच्या संबंधित क्षेत्रातील व्यापार्यांना भेटावे आणि ‘वस्तू आणि सेवा कर’ अल्प करण्याच्या सरकारच्या पुढाकाराचा संदेश जनतेपर्यंत पोचवावा. उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी हे आवाहन केले.
PM Modi’s appeal to NDA MPs:
👉 Organize a “Swadeshi Mela” in constituencies! 🇮🇳1️⃣ Vocal for Local is not just a slogan – it’s the backbone of jobs & economy.
2️⃣ Swadeshi Melas will give artisans, craftsmen & local industries a platform.
3️⃣ #AtmanirbharBharat secures India’s… pic.twitter.com/OEQmbfbonK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 9, 2025
या वेळी पंतप्रधान म्हणाले की,
१. ‘व्होकल फॉर लोकल’ (स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणारी मोहीम) ही केवळ एक घोषणा नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी एक सशक्त पाया आहे.
२. ‘स्वदेशी मेळा’ लहान कारागीर, हस्तकलाकार आणि स्थानिक उद्योग यांना एक नवीन व्यासपीठ प्रदान करेल.
३. ‘आत्मनिर्भर भारत’ ही केवळ स्वावलंबनाची कल्पना नाही, तर देशाच्या भविष्याची सुरक्षितता आहे.
४. जेव्हा भारतीय उत्पादनांचा वापर वाढेल, तेव्हा रोजगाराच्या संधी तर निर्माण होतीलच, याखेरीज परकीय आयातीवरील अवलंबित्वही अल्प होईल. कुणीही गुंतवणूक केली, तरी उत्पादन भारतीय असले पाहिजे आणि हाच ‘स्वदेशी मंत्र’ आहे.
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ