एका जिल्ह्यातील हिंदुद्रोही प्रकार !
मुंबई , ७ सप्टेंबर (वार्ता.) – एका जिल्ह्यातील महानगरपालिकेकडून कृत्रिम तलाव आणि कृत्रिम टाक्या यांमध्ये विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्ती नंतर काढून एका मैदानात मोठा खड्डा करून त्यात पुरण्यात आल्या. (अशा प्रकारे धर्महानी करून पाप न करता शाडूच्या मातीच्या आणि नैसर्गिक रंगाने बनवलेल्या लहान श्री गणेशमूर्ती आणण्याची सक्ती करायला हवी. नंतर त्या वहात्या पाण्यात विसर्जित करू दिल्यास धर्मशास्त्रानुसार विसर्जन होऊन नागरिकांना त्याचा लाभ होईल ! – संपादक)
१. नैसर्गिक जलस्रोतात गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होऊ नये, हे गोंडस कारण पुढे करत महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात शहरात कृत्रिम तलाव उभारण्यात आले. तलावांमध्ये विसर्जन करू नये, यासाठी तलावाच्या कठड्यांना बांबूची तटबंदी करण्यात आली. यामुळे नागरिकांनी श्री गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन केले.
२. मूर्ती कृत्रिम तलावांत विसर्जित करता येण्यासाठी आधी दीड, ५ आणि ७ दिवसांच्या विसर्जित केलेल्या मूर्ती काढण्यात आल्या. त्या मूर्ती ठेकेदाराच्या खासगी ट्रकमध्ये भरल्या. हे कामगार त्या मूर्तींच्या ढिगार्यावरही बसले होते.
३. ट्रकमध्ये ठेवलेल्या मूर्ती ताडपत्रीने झाकण्यात आल्या होत्या. मूर्ती ज्या खड्ड्यात टाकणार होते, त्या ठिकाणी रात्री उशिरा १२ वाजल्यानंतर नेण्यात आल्या.
४. मूर्ती पुरण्याच्या ठिकाणी असलेल्या मैदानात मोठे खड्डे खोदण्यात आले होते. मूर्ती त्यात टाकत असल्याचा प्रकार कुणालाही कळू नये, यासाठी जेसीबीच्या साहाय्याने खड्ड्यातील मूर्तींवर माती घालण्यात आली. या प्रकरणी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
संपादकीय भूमिका
|
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)