
चेन्नई – आयआयटी मद्रासचे प्राध्यापक मितेश खापरा यांना ‘टाइम’ मासिकाने वर्ष २०२५ च्या ‘१०० सर्वांत प्रभावशाली एआय (कृत्रिम बुद्धीमत्ता) तज्ञां’च्या सूचित समाविष्ट केले आहे. जगातले श्रीमंत अब्जाधीश इलॉन मस्क आणि ‘ओपन एआय’चे संस्थापक सॅम ऑल्टमन यांसारख्या मोठ्या नावांचा या सूचित समावेश आहे.
भारतीय भाषांमध्ये एआय संशोधनासाठी मितेश खापरा यांना हा सन्मान मिळाला आहे. मितेश खापरा यांनी ‘एआय ४ भारत’ नावाचा एक उपक्रम चालू केला आहे. हा उपक्रम भारतीय भाषांमध्ये एआय सुलभ करण्यासाठी ‘ओपन-सोर्स टूल्स्’ आणि ‘डेटासेट’ सिद्ध करतो.
‘एआय ४ भारत’ने भारतातील ५०० जिल्ह्यांमधून सहस्रो घंट्यांचे ‘व्हॉइस रेकॉर्डिंग’ गोळा केले आहे. यामध्ये २२ अधिकृत भारतीय भाषांचा समावेश आहे. त्यांच्या योगदानामुळे भारत सरकारच्या ‘भाषिनी मिशन’लाही साहाय्य झाले आहे. या पुरस्कारामुळे प्रा. मितेश खापरा यांच्या संशोधनाला जागतिक मान्यता मिळाली आहे.
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी