भाजपचे आमदार सी.टी. रवि यांचे वक्तव्य

रायचुरू (कर्नाटक) – हिंदुद्वेषी लेखिका बानू मुश्ताक यांनी जसे देवी भुवनेश्वरी आणि कन्नड सांस्कृतिक चिन्हे यांच्या विरुद्ध वक्तव्ये केली, तशी टिपणी जर त्यांनी इस्लामविरुद्ध केली असती, तर त्यांना दगडांनी ठेचून ठार मारले गेले असते, असे वक्तव्य भाजपचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस आणि कर्नाटकाचे आमदार सी.टी. रवि यांनी केला. येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, मुश्ताक यांचे विचार या भूमीच्या संस्कृतीच्या विरोधात आहेत. मैसुरू येथील दसर्याचे उद्घाटन बानू मुश्ताक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
Mysuru Dasara Controversy
🚨 “If Banu Mushtaq had spoken against Islam, she would have been stoned to death!” – BJP MLC C.T. Ravi
Demands that she issue a public apology for hurting the sentiments of the Hindus#Mysoredasara #DasaraCelebration
PC: @UttarKarnataka1 https://t.co/NX3uYTeWrG pic.twitter.com/3mrjpEoYJH— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 5, 2025
ते पुढे म्हणाले की, जर आपण इस्लाम, कुराण किंवा महंमद पैगंबर यांच्याविषयी असेच काही बोललो, तर ते सहन करतील का ? आम्ही केवळ अशी मागणी करतो की, बानू मुश्ताक यांनी बहुसंख्य समुदायाच्या भावना दुखावल्यावरून जाहीर क्षमा मागावी.
या वेळी त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका करत म्हटले की, ते मतपेटीचे राजकारण करत आहेत.

उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
संपादकीय : हिंदू जात्यात !
रत्नागिरीत आयोगाचे कामकाज तातडीने पर्यायी जागेतून चालू करावे ! – संजय वैशंपायन
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !
अवैध दारूधंदेवाल्यांची माहिती न दिल्यास संबंधित प्रशासकीय कारभार्यांचे मानधन रोखणार !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा