|
(स्टिंग ऑपरेशन म्हणजे गुप्त पद्धतीने केलेले चित्रीकरण)

आगरा (उत्तरप्रदेश) – पाद्री राजकुमार लालवानी आणि त्याची टोळी करत असलेल्या हिंदूंच्या धर्मांतराचे षड्यंत्र ‘स्टिंग ऑपरेशन’द्वारे उघड झाले आहे. यासंदर्भात पोलिसांच्या हाती लागलेल्या व्हिडिओजमध्ये येथील शाहगंज भागात पाद्री राजकुमार हिंदु महिलांना सांगत आहे, ‘जर तुम्हाला लाभ हवे असतील, तर मंगळसूत्र आणि सिंदूर यांचा वापर करणे सोडून द्या.’ पोटदुखीचा त्रास असलेल्या एका महिलेला तो म्हणाला की, तुमच्या घरातून हिंदु देवतांच्या मूर्ती काढून टाका. तुम्ही राक्षसांची पूजा करत आहात. त्यामुळेच तुम्हाला त्रास होत आहे. या स्वर्गाचा एकमेव मालक येशू ख्रिस्त आहे. २ सप्टेंबरला पोलिसांनी राजकुमार याच्यासह एकूण ८ जणांना अटक केली.
धर्मांतराचे षड्यंत्र असे आले समोर !
पाद्री लालवानी याच्या घराजवळ रहाणार्या घनश्याम हेमलानी या जागृत हिंदूने ‘स्टिंग ऑपरेशन’ करून ही माहिती समोर आणली. त्यांची पत्नी राधा यांना पोटदुखीचा त्रास असल्याने त्यांना काही महिला सत्संगाच्या बहाण्याने राजकुमारच्या घरी घेऊन गेल्या. तेथे पाद्र्याने त्यांना म्हटले, ‘तुमच्या त्रासाचे कारण तुमच्या देवता आहेत. जर तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, तर सर्व काही ठीक होईल. त्याने राधा यांच्या हातातील पवित्र धागा आणि गळ्यातील मंगळसूत्र काढले.’
हे प्रकरण घनश्याम यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी या संपूर्ण घटनेचे छुप्या प्रकारे चित्रीकरण केले आणि मंत्री योगेंद्र उपाध्याय यांना दाखवले. पुढे या सगळ्याची पोलिसात तक्रार करून २ सप्टेंबरला सर्व ८ जणांना अटक करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये राजकुमार लालवानी, अनुप कुमार, कमल कुंडलानी, जयकुमार, अरुण आणि ३ महिला यांचा समावेश आहे. (हिंदूंची नावे धारण करणार्या ख्रिस्त्यांपासून सावधान ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती