
बीजिंग – चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे स्वागत करत ‘पुतिन हे माझे ‘जुने मित्र’ आहेत’, असे म्हटले. अलीकडच्या काळात चीन आणि रशिया यांच्यामधील संबंध अधिक दृढ झाले असल्याचे या विधानावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
आम्ही तेव्हाही एकत्र होतो आणि आजही एकत्र आहोत ! – रशिया
पुतिन यांनीही जिनपिंग यांचा ‘प्रिय मित्र’ असा उल्लेख केला. ते म्हणाले की, दोन्ही देशांमधील संबंध ‘अभूतपूर्व उंची’वर पोचले आहेत. आम्ही तेव्हाही एकत्र होतो आणि आजही एकत्र आहोत. औपचारिक चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी त्यांच्या काही वरिष्ठ साहाय्यकांसह पुन्हा भेटीची योजना आखली आहे.
चीनने व्यापाराद्वारे रशियाला पाठिंबा दिला
चीन युक्रेन युद्धात तटस्थ आहे; परंतु त्याने रशियाशी व्यापार चालू ठेवून रशियाला आर्थिक पाठिंबा दिला आहे, तर पाश्चात्त्य देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. काही चिनी आस्थापनांवर रशियन सैनिकी उद्योगाला साहाय्य केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
‘सोव्हिएत युनियन’ने चीनला केले होते साहाय्य !
दुसर्या महायुद्धाच्या वेळी ‘सोव्हिएत युनियन’ बहुतेक काळ आशियात तटस्थ राहिले, परंतु १९३० च्या दशकात त्याने जपानी आक्रमणाविरुद्धच्या लढाईत चीनला साहाय्य केले. युद्धाच्या शेवटच्या काळात ‘सोव्हिएत युनियन’ने जपानविरुद्ध युद्ध घोषित केले आणि जपानी लोकांनी व्यापलेल्या ईशान्य चीनमध्ये त्याचे सैन्य पाठवले.
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा