आस्थापनाने हे विज्ञापन तात्काळ हटवून हिंदूंची जाहीर क्षमा मागण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी !

(वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक )
पुणे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिरीच (Oxyrich) आस्थापनाने त्याच्या पाण्याच्या बाटलीचा उपयोग करून श्री गणेशाची प्रतिमा दर्शवणारा विज्ञापन फलक प्रसिद्ध केला आहे. शिंदे पार चौक, शनिवार पेठ, कसबा पेठ, नूतन मराठी विद्यालयाजवळ, बाजीराव रोड, विश्रामबाग वाडा आदी विविध ठिकाणी हे फलक लावले आहेत. ‘श्री गणेशभक्तांचे हार्दिक स्वागत’, असे फलक लावून प्रत्यक्षात मात्र श्री गणेशाचे विडंबन केले आहे.
१. ‘आस्थापन स्वागतपर फलकावर श्री गणेशाचे विडंबन करून काय साध्य करू पहात आहे ?’, असा प्रश्न सामाजिक माध्यमांवर विचारला गेला आहे. ‘श्री गणेशाचे विडंबन सहन केले जाणार नाही’, असा निर्धारही हिंदूंनी सामाजिक माध्यमांवर व्यक्त केला आहे.
२. हिंदु जनजागृती समितीने त्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. समितीचे श्री. पराग गोखले यांनी या संदर्भात ‘एक्स’वर ट्वीट करून सांगितले, ‘श्री गणेशासारख्या आराध्यदैवताचे व्यवसायासाठी विडंबन करणे हा हिंदूंच्या श्रद्धेवर सरळ आघात आहे. ऑक्सिरीच आस्थापनाने हे विज्ञापन तात्काळ हटवून हिंदूंची जाहीर क्षमा मागावी.’
📍PUNE: श्री गणेशाचे विडंबन करणाऱ्या ऑक्सिरीच कंपनीचा जाहीर निषेध !
🛑या जाहिरातीमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, याचा या आस्थापनाने विचार करावा आणि ही जाहिरात लवकर काढून घ्यावी. समस्त हिंदूंची जाहीर माफी मागावी !@HinduJagrutiOrg @SG_HJS | #Ganpati #Pune pic.twitter.com/TUszLkzKe8
— Parag Gokhale (@Parag_hjs) August 29, 2025
संपादकीय भूमिकाहिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे ते कधी कलेच्या, तर कधी व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्याच श्रद्धास्थानांचा अवमान करत आहेत. अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे ! |
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
(म्हणे) ‘श्रीकृष्ण मुसलमान होते आणि ५ वेळा नमाजपठण करायचे !’ – Maulana Jarjis Ansari
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !
पानशेत (पुणे) पूरग्रस्त सोसाट्यांचे प्रश्न ६५ वर्षांनंतरही प्रलंबित !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !