३० ऑगस्टला पुन्हा कारागृहात जावे लागणार

जोधपूर (राजस्थान) – राजस्थान उच्च न्यायालयाने संतश्री पू. आसारामजी बापू यांच्या अंतरिम जामिनाचा कालावधी वाढवण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना ३० ऑगस्ट या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत जोधपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी जावे लागणार आहे. ते गुजरात आणि राजस्थान राज्यांमध्ये बलात्काराच्या प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते वैद्यकीय कारणांमुळे अंतरिम जामिनावर बाहेर आहेत. कर्णावती नागरी रुग्णालयातून मिळालेल्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे न्यायालयाने अंतरिम जामीन वाढवण्याची याचिका फेटाळून लावली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, वैद्यकीय अहवालानुसार आसाराम बापू यांची प्रकृती इतकी गंभीर नाही की, त्यांचा अंतरिम जामीन वाढवावा.
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ