राजापूर (रत्नागिरी) येथील सूर्य मंदिराच्या रक्षणासाठी आयोजित धर्मसभा

राजापूर (जिल्हा रत्नागिरी) – माझा धर्म टिकला पाहिजे, हे माझ्यासहित प्रत्येक हिंदूचे स्वप्न असले पाहिजे. धर्मासाठी कोणतीही तडजोड नाही. ‘डरेंगे तो मरेंगे’ हे वेळीच लक्षात घ्या आणि हिंदू म्हणून संघटित होऊन केवळ सूर्य मंदिरच नव्हे, तर भविष्यात हिंदु धर्म टिकवण्यासाठी एकसंघतेची वज्रमुठ करा. सूर्य मंदिर रक्षणासाठी रामानंद नरेंद्रचार्य दक्षिण पीठाची सर्व शक्ती तुमच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही दक्षिणपीठ नाणीज धामचे जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्राचार्य महाराजांनी राजापूर येथील धर्मसभेत दिली. हिंदूंनी एकजूट दाखवून मतदान केल्यामुळेच वर्ष २०१४ मध्ये देशात परिवर्तन झाले आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यांनी हिंदु धर्माची पताका जगभरात फडकवली. ‘हिंदु धर्मच विश्वबंधुत्व आणू शकतो’, हे मोदी यांनी कर्तृत्वातून दाखवून दिले. २२ ऑगस्ट या दिवशी राजापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने सूर्य मंदिराच्या रक्षणासाठी आयोजित धर्म सभेत महाराज बोलत होते.
त्यांनी पुढे सांगितले की,
१. हिंदू बहुसंख्य असलेल्या आपल्या देशात हिंदूंनाच श्रद्धास्थानांसाठी कटोरा घेऊन न्याय मागावा लागतो, ही हिंदूंसाठी लांच्छनास्पद गोष्ट आहे. हे केवळ हिंदू संघटित नसल्यामुळे घडत आहे.
२. हिंदू जातीपाती, पंथ, पक्ष, संप्रदाय यांमध्ये विभागले गेले आहेत. राजकीय लोकांपुढे लाचार होतात. त्यामुळे आज देशात बहुसंख्य असूनही त्यांची राजकारण्यांकडून नोंद घेतली जात नाही. यापुढे तरी हिंदूंनी वास्तव लक्षात घेऊन संघटित होणे काळाची आवश्यकता आहे.
३. आज लव्ह जिहाद, भूमी जिहाद, वक्फ बोर्डाचा कायदा, धर्मांतर यांसारख्या अनेक प्रकारचे आघात सातत्याने हिंदु धर्मावर होत आहेत. अशा घटनांचा आपण निर्भीडपणे सामना केला पाहिजे.
राजापूरचे सूर्य मंदिर हिंदूंचेच ! – जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजहिंदूंची मतपेढी निर्माण करणे आवश्यक आहे. यापुढे हिंदू म्हणून संघटित होऊन जो हिंदूंचे रक्षण करील, त्याच्याच पाठीशी उभे राहण्याचा निर्धार हिंदूंनी करणे आवश्यक आहे. आपली हिंदु संस्कृती टिकवण्यासाठी मंदिरे वाचवलीच पाहिजेत. राजापूर येथील सूर्य मंदिर हे हिंदूंचेच मंदिर आहे. त्यावर असलेले शंखाचे चित्र हे भगवान श्री विष्णूचे प्रतीक आहे. त्यामुळे त्यासाठी वेगळा पुरावा कसला हवा?, असा प्रश्नही जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी उपस्थित केला. |
हिंदूंनी जागृत आणि सतर्क राहावे ! – आमदार संग्राम जगताप
या वेळी उपस्थित असलेले अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनीही अनेक उदाहरणे सांगून हिंदूंनी जागृत होऊन नेहमीच सतर्क राहण्याची आवश्यकता समजावून सांगितली. तसेच धर्मयोद्धा यासह श्री. सागरभैय्या बेग यांनीही त्यांच्या संघटनेच्या वतीने अशा आक्रमणांना कसे तोंड दिले जाते आणि त्याला मिळणारे यश याविषयी माहिती दिली.

चिंच बांध पुरातन वास्तूचे सत्य उलगडण्यासाठी राजापूर प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना ! – उदय सामंत, पालकमंत्री
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी २३ ऑगस्ट या दिवशी राजापूर येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, चिंच बांध येथील पुरातन वास्तूबाबत त्यांनी केलेले विधान हे पुरातत्व विभाग आणि नगरपरिषदेकडून मिळालेल्या अहवालावर आधारित होते, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नव्हते. सदर अहवालामध्ये ते पुरातन सूर्य मंदिर असल्याची नोंद आढळून न आल्याने तसे उत्तर आपण त्यासंदर्भातील लक्षवेधीवर विधीमंडळात दिले; पण त्याचा विपर्यास करून माझी अपकीर्ती करण्याचा प्रयत्न झाला, असे त्यांनी सांगितले. तसेच राजापूर शहरातील ती पुरातन वास्तू सूर्य मंदिर आहे का? याचे संशोधन करण्यासाठी राजापूर प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून ती समिती १० ऑक्टोबर २०२५ पर्यंत अहवाल सादर करील. या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही देण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या दिव्य भक्तीसत्संगाच्या माध्यमातून साधक अनुभवत असलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची असीम कृपा !
गोपाळगड शासनाचा असून सर्वांसाठी खुला : अफवांवर विश्वास ठेवून कायदा हातात घेऊ नका !
‘स्वभावदोष न्यून होऊन आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी व्यष्टी साधनेलाच प्राधान्य द्यायला हवे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
चर्चासत्राच्या वेळी संगीत विभागातील साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांना आलेल्या अनुभूती !