राष्ट्रीय जनता दलाचे वरिष्ठ नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांचे बिनबुडाचे विधान

पाटलीपुत्र (बिहार) – धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, समाजवाद म्हणजे काय, राज्यघटना म्हणजे काय, आपल्या पूर्वजांचा इतिहास काय आहे ?, हे हिंदु बांधवांना अधिक समजावण्याची आवश्यकता आहे, असे विधान राष्ट्रीय जनता दलाचे वरिष्ठ नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांनी एका भाषणात केले होते. त्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. या टीकेवर स्पष्टीकरण देतांना त्यांनी पुन्हा आक्षेपार्ह विधान केले. ते म्हणाले की, आपल्या हिंदु बांधवांना आजकाल एका संघटनेकडून उन्मादी बनवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. यानंतर त्यांच्यावर भाजपकडून टीका होऊ लागली आहे.
सिद्दीकी स्पष्टीकरण देतांना म्हणाले की, माझे विधान चुकीच्या पद्धतीने घेतले गेले. सर्व धर्मांच्या लोकांनी मिळून देश सशक्त करणे, हे त्यांचे दायित्व आहे. राज्यघटनेत बहुसंख्य आणि अल्पसंख्य यांचा उल्लेख आहे. अल्पसंख्य अनेक गोष्टींमध्ये मागे पडले आहेत; म्हणून सरकार त्यांना काही सुविधा देते. (अल्पसंख्य मागे पडले, याचे कारण त्यांची धर्मांधता आहे. सरकारने कितीही सुविधा दिल्या, तरी त्याचा यावर काहीच परिणाम होणार नाही ! – संपादक) बहुसंख्य मोठे भाऊ आहेत. त्यांच्या हातात शक्ती आहे; म्हणून ते समाजाला एकत्र करू शकतात. आता एकच पक्ष सतत हिंदु-मुसलमान या घोषणांचा वापर करत आहे. माझी टीका त्यांच्यावर आहे, कोणत्याही धर्म किंवा जाती यांवर नाही. (देशात काही इस्लामी विचारांचे पक्ष आहेत. ते धार्मिक द्वेष पसरवत आहेत. यावर सिद्दीकी तोंड का उघडत नाहीत ? – संपादक)
हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचा धडा देण्याची आवश्यकता नाही ! – भाजप

सिद्दीकी यांच्या विधानावर भाजपचे नेते दानिश इक्बाल यांनी टीका केली. त्यांनी म्हटले की, सिद्दीकी यांना भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचे ज्ञान नाही; म्हणून ते असे बोलत आहेत. हिंदूंनी नेहमी सर्वांना आपल्या संस्कृतीत सामावून घेतले आहे. हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचा धडा देण्याची आवश्यकता नाही.
बिहारचे मंत्री आणि भाजप नेते संजय सरावगी यांनी सिद्दीकी यांच्या स्पष्टीकरणावर टीका करतांना म्हटले की, सिद्दीकी क्षमा मागण्याऐवजी हिंदूंना ‘उपद्रवी’ ठरवत आहेत. ते मुसलमानांचे नेते होण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या मनातील विचारच त्यांच्या जिभेवर आला आहे. आम्ही राज्यघटना मानणारे आहोत.
संपादकीय भूमिका
|
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ