बाराक्षार चिकित्सा – (Biochemic System of Medicine)

बाराक्षार चिकित्सापद्धतीचा शोध वर्ष १८३२ मध्ये लागला. ही एक विशिष्ट उपचारपद्धत असून ती ‘लॉ ऑफ डेफिशियन्सी (उणिवांचा नियम)’ या तत्त्वावर आधारलेली आहे. प्रोफेसर मोलेशॉट (Moleschott) यांच्या म्हणण्याप्रमाणे इंद्रियांची रचना आणि चेतनाशक्ती या त्यांमध्ये असलेल्या अजैविक पदार्थांच्या (Inorganic substances च्या) प्रमाणावर अवलंबून असतात. अजैविक पदार्थांच्या उणिवेमुळे पेशींचे कार्य सुसंवादितपणे चालत नाही आणि ते अजैविक पदार्थ योग्य प्रमाणामध्ये दिल्यानंतर पेशींचे कार्य सुरळीत होते. त्यामुळे बाराक्षार पद्धतीप्रमाणे आवश्यक ते क्षार दिल्यानंतर रोग नैसर्गिकपणे बरा करण्याच्या शरिराच्या प्रक्रियेला चालना मिळते. 

२२ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘बाराक्षार औषधांचा इतिहास, बाराक्षार औषधे सिद्ध करण्याची पद्धत, तसेच औषधाची निवड आणि औषध देण्याची पद्धत’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.                

(भाग २)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/948481.html

६. बाराक्षार उपचारपद्धतीतील १२ औषधांची नावे 

१. कल्केरिया फ्लुओरिका Calcium fluoride (Calc. fluor.)

२. कल्केरिया फॉस्फोरिका Calcium phosphate (Calc. phos.)

३. कल्केरिया सल्फुरिका Calcium Sulphate (Calc. Sulph.)

४. फेरम फॉस्फोरिकम Phosphate of iron (Ferr. phos.)

५. काली म्युरियाटिकम Potassium chloride (Kali Mur.)

६. काली फॉस्फोरिकम Potassium phosphate (Kali phos.)

७. काली सल्फुरिकम Potassium Sulphate (Kali Sulph.)

८. मॅग्नेशियम फॉस्फोरिकम Magnesium phosphate (Mag. phos.)

९. नेट्रम म्युरिआटिकम Sodium chloride (Nat. Mur.)

१०. नेट्रम फॉस्फोरिकम Sodium phosphate (Nat. phos.)

११. नेट्रम सल्फुरिकम Sodium Sulphate (Nat. Sulph.)

१२. सिलिशिआ Silica (Silicea)

ही औषधे काही ठराविक कालावधीसाठी लक्षणांनुसार रुग्णाला दिली असता रुग्ण बरा होतो. या औषधांची १ ते २८ नंबरपर्यंत मिश्रणे उपलब्ध आहेत. विशिष्ट रोगासाठी विशिष्ट नंबरचे मिश्रण दिले जाते.

होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता

७. बाराक्षार औषधांची मिश्रणे 

अ. रक्तक्षय (Anaemia) : कल्केरिया फॉस ३x, फेरम फॉस ३x, काली फॉस ३x, नेट्रम मूर ६x

आ. दमा (Asthma) : काली फॉस ३x, मॅग फॉस ३x, नेट्रम मूर ६x, नेट्रम सल्फ ३x

इ. बद्धकोष्ठता (Constipation) : कल्केरिया फ्लोर ३x, काली मूर ३x, नेट्रम मूर ३x, सिलिशिया ६x

ई. सर्दी-पडसे (Coryza Cold) : फेरम फॉस ३x, काली मूर ३x, काली सल्फ ३x, नेट्रम मूर ६x

उ. खोकला (Cough) : फेरम फॉस ३x, काली मूर ३x, काली सल्फ ३x, नेट्रम मूर ६x, मॅग फॉस ६x

ऊ. मधुमेह (Diabetes) : कल्केरिया फॉस ३x, फेरम फॉस ३x, काली फॉस ३x, मॅग फॉस ३x, नेट्रम फॉस ३x, नेट्रम सल्फ ३x

ए. ज्वर (Fever) : फेरम फॉस ३x, काली मूर ३x, काली सल्फ ३x, नेट्रम मूर ३x, नेट्रम सल्फ ३x

ऐ. डोकेदुखी (Headache) : फेरम फॉस ३x, काली फॉस ३x, मॅग फॉस ३x, ‘नेट्रम मूर’ ६x

ओ. संधीवात (Rheumatism and gout) : फेरम फॉस ३x, काली सल्फ ३x, मॅग फॉस ३x, नेट्रम सल्फ ३x

औ. त्वचा विकार (Skin diseases) : कल्केरिया फ्लोर ६x, कल्केरिया सल्फ ३x, काली सल्फ ३x, नेट्रम मूर ३x, नेट्रम सल्फ ३x

अं. दंत विकार (Teething troubles) : कल्केरिया फॉस ३x, फेरम फॉस ३x

क. औषधाचे प्रमाण आणि वेळा : मोठ्या व्यक्तींना दिवसातून३ ते ४ वेळा ३ ते ५ गोळ्या द्याव्यात, तर लहान मुलांना २ ते ३ गोळ्या, तसेच नवजात बालकांना १ गोळी द्यावी.’

(क्रमशः)

संकलक : होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता, पुणे (१३.४.२०२५)