
धुळे – महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून १७ ऑगस्ट या दिवशी धुळे येथे जिल्हास्तरीय मंदिर अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. त्याच्या आयोजनाची बैठक देवपूर येथील श्री स्वामीनारायण मंदिरात पार पडली. स्वामीनारायण मंदिराचे श्री आनंद जीवन स्वामी यांनी बैठकीत सर्वांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या वेळी श्री स्वामीनारायण यांच्या चरणी श्रीफळ अर्पण करण्यात आले.
धुळे येथील श्री स्वामीनारायण मंदिरात १७ ऑगस्ट या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत अधिवेशन असेल. निवृत्त साहाय्यक धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, वारकरी संप्रदायाचे आळंदी येथील ह.भ.प. नरहरि महाराज, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, विचारवंत श्री. प्रकाश पाठक, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्ह्यातील शेकडो मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, सेवेकरी, तसेच मंदिर क्षेत्रात कार्य करणारे वकील, व्यावसायिक अधिवेशनाला उपस्थित रहातील. या अधिवेशनाचे आयोजन महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदु जनजागृती समिती, श्री स्वामीनारायण मंदिर, श्री नरसिंह मंदिर, श्री एकवीरा देवी मंदिर, कान्हादेश वारकरी सेवा मंडळ यांच्या पुढाकाराने झालेले आहे.

गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
अध्यात्म शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष साधना करणे महत्त्वाचे !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांकडून स्वागत !
Badrinath Donation Theft : बद्रीनाथ धाममधील चोरीच्या प्रकरणी एकास अटक
Baglamukhi Mandir Online Fraud : मध्यप्रदेशातील माँ बगलामुखी मंदिरात हवन आणि पूजा करण्याच्या नावाखाली भाविकांची ऑनलाईन फसवणूक