मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये ३५ टक्के मुसलमान होते. त्यांचे ११ अंगरक्षक मुसलमान होते आणि त्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावर मशीद बांधली होती, अशा प्रकारे कपोलकल्पित इतिहास ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. अशा कपोलकल्पित चित्रपटावर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी या चित्रपटाचे खरे स्वरूप सामाजिक माध्यमांद्वारे मांडणार्या ‘सकल हिंदु समाज ग्रुप १’ या ‘वॉट्सअप’ गटाचे अॅडमिन श्री. प्रमोद काटे यांनाच कारवाईची नोटीस पाठवली आहे.
Bhandup Police Station has sent a notice to #Hindutva Karyakartas for posting a protest on social media against the film "Khalid Ka Shivaji", which spreads false history and seeks to divide the minds of Hindus.@MumbaiPolice have completely surrendered to #Jihadi forces!… pic.twitter.com/hEzYFgKXaF
— Sakal Hindu Samaj (@sakal_hindu_) August 3, 2025
सामाजिक माध्यमांवर अशा प्रकारे संदेश पाठवल्यास गुन्हा नोंदवण्याची चेतावणी पोलिसांनी या नोटिसीमध्ये दिली आहे. २ ऑगस्ट या दिवशी भांडुप पोलीस ठाण्यातून श्री. प्रमोद काटे यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
Devout Hindu served Police notice for exposing the truth behind ‘Khalid Ka Shivaji’, a film that paints Chhatrapati Shivaji Maharaj as a Mu$l!m sympathizer!
WhatsApp group admin sent legal notice for a post calling out the film’s false historical claims.
🔹 Police who crack… pic.twitter.com/R1taHdLXp6
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 4, 2025
‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाच्या प्रकरणी हिंदू महासंघाची ‘सेन्सॉर बोर्ड’ला नोटीस !कोणत्याही परिस्थितीत चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही ! – हिंदू महासंघ
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा खोटा इतिहास असलेल्या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपट कोणत्याही परिस्थितीत आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी चेतावणी हिंदू महासंघाकडून देण्यात आली आहे. याविषयी हिंदू महासंघाने चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला (सेन्सॉर बोर्ड) कायदेशीर नोटीसही पाठवली आहे. ![]() हा इतिहास पालटण्याचा प्रकार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अनुमती मिळाली, तर होणार्या परिणामाला चित्रपट परीनिरीक्षण मंडळ उत्तरदायी असेल, अशी चेतावणीही हिंदू महासंघाने नोटिसीमध्ये दिली आहे. हिंदू महासंघाने चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला पाठवलेल्या पत्राची प्रत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवली आहे.
|
मिचेल थेवर यांनी ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाची निर्मिती केली असून राज मोरे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘शिवाजी अंडर ग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या आक्षेपार्ह नाटकावर आधारित या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. गोवा येथील इफ्फी (‘इंडियन पॅनोरमा एनडीएफसी फिल्म फेस्टिव्हल’), तसेच अजंठा-एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४ या चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाचे नामांकन झाले होते. फ्रान्समध्ये होणार्या ‘कान’ या चित्रपट महोत्सवासाठी या चित्रपटाची निवड झाली आहे.
संपादकीय भूमिका
|


Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन