‘जुलै २०२३ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करण्याची संधी मिळाली. तेव्हा आश्रमात सेवा करतांना मला अनुभवायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या भक्तीसत्संगातील प्रसंग प्रत्यक्ष अनुभवत आहे’, असे जाणवणे

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ भक्तीसत्संगात कथा सांगत असतांना ‘ते प्रसंग समोर घडत आहेत आणि मी त्यातील एक घटक आहे’, असे जाणवून मला आनंद होत होता. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी भावपूर्ण कृतज्ञता ! माझ्या मनात त्यांचा विचार येताच माझा त्यांच्याप्रती भाव जागृत होतो.
२. संत आणि सद्गुरु यांच्याप्रती भावावस्था अनुभवणे
अ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना पहाताच माझा नामजप चालू होतो. माझ्या मनात नामाविषयी भाव निर्माण होतो. त्यांना पाहिल्यावर ‘मला चैतन्य मिळते’, असे मला जाणवते. माझ्याकडून एखादी सेवा परिणामकारक झाल्यास, त्या दिवशी मला सद्गुरु गाडगीळकाकांचे दर्शन होते. प.पू. गुरुदेव आणि सद्गुरु गाडगीळकाका हे दोन्ही एकच असल्याची अनुभूती येते.

आ. पू. संदीप आळशी (सनातनचे ११ वे (समष्टी) संत, वय ५० वर्षे) यांचे दर्शन झाल्यानंतर मला आनंद होतो. मला उत्साह वाटतो आणि चैतन्य जाणवते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे पुष्कळ असून ते निष्काम भावाने ज्ञान देतात.
इ. पू. रेखा काणकोणकर (सनातनच्या ६० व्या (समष्टी) संत, वय ४७ वर्षे) यांच्यातील ‘संयम, शांतपणा, नियोजनकौशल्य’ इत्यादी गुणांमुळेच महाप्रसाद वेळेत सिद्ध होतो. ‘त्यांचा जन्म प.पू. गुरुदेवांची सेवा करण्यासाठीच झाला आहे’, याची अनुभूती येते. त्यांच्याशी बोलल्यावर माझ्या पुष्कळ अडचणी सुटतात.
ई. आश्रमातील संत सतत साधनारत असल्याने आणि गुरुदेवांप्रती असलेल्या त्यांच्या अपार भावामुळे आश्रमात सर्वत्र चैतन्याचा लाभ होतो. मी मनाची सकारात्मक स्थिती अनुभवते. मला सद्गुरु आणि संत यांच्या प्रती कृतज्ञता वाटते.
३. साधकांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे
अ. प्रत्येक साधक हा ईश्वराचा अंश आहे. साधक प्रत्येक सेवा भावपूर्ण करतात. ते स्वतःची साधना म्हणून आश्रमातील कार्यपद्धतीचे पालन आनंदाने करतात.
आ. प्रत्येक साधक हा गुरुतत्त्वाने व्याप्त आहे.
इ. आश्रमात साधकांच्या सहवासात आनंद जाणवतो.
ई. अनेक साधक मागील २५ वर्षांपासून आश्रमात आहेत. त्यांच्या अनुभूती ऐकतांना पुष्कळ कृतज्ञता आणि आनंद वाटतो.
उ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेचा अभ्यास करतांना ‘एका आध्यात्मिक ज्ञानकेंद्रात बसून ज्ञान घेत आहे’, असे मला जाणवते.
ऊ. आश्रमात माझा प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव जागृत होतो.
ए. प.पू. गुरुदेव हे साधकांच्या जीवनाचे केंद्रबिंदू आहेत. ते संपूर्ण चराचरात आहेत. ते सतत ज्ञान देण्यास उत्सुक असतात आणि नवीन गोष्टी शिकवतात.
ऐ. आश्रमातील कार्यपद्धती शिकत असतांना परिपूर्ण ज्ञान प्राप्त होते आणि मला प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटते.
४. अन्नपूर्णा कक्षात सेवा करतांना मिळालेला आनंद अविस्मरणीय असणे
अ. मला अन्नपूर्णा कक्षात सेवा करण्याची संधी मिळाली; म्हणून मला पुष्कळ कृतज्ञता वाटते. अन्नपूर्णा कक्षात सेवा करतांना माझ्यात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो. मला अविरत सेवा करता येते आणि सेवेचा आनंद मिळतो.
आ. ‘मी रामनाथी आश्रमात जाऊन सेवा करीन’, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. प.पू. गुरुदेवांनी निर्माण केलेला आश्रम पहातांना आणि तिथे राहून सेवा करतांना मिळालेला आनंद अवर्णनीय आहे.
इ. ‘आश्रमातील कार्यपद्धती’ हे सनातन संस्थेचे वैशिष्ट्य आहे. साधकांमध्ये पालट घडवणार्या पुढील शब्दांतून चैतन्य जाणवते. ‘बहिर्मुखतेतून अंतर्मुखतेकडे, भावनेतून भावाकडे, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करून गुणवृद्धीकडे, स्थुलातून सूक्ष्मात, अनेकातून एकात आणि सगुणातून निर्गुणात.’
५. अनुभूती
५ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले राधाकृष्ण मंदिरात येऊन गेल्यानंतर मंदिरातील चैतन्य वाढणे आणि राधाकृष्णाच्या मूर्तीतील तत्त्वात वाढ होणे : आमच्या कारवार गावातील राधाकृष्ण मंदिरात पूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे २ वेळा प्रवचन झाले होते. प.पू. गुरुदेव त्या मंदिरात येऊन गेल्यानंतर त्या मंदिरात एक वेगळेच चैतन्य जाणवते. श्री राधाकृष्णाच्या मूर्तीकडे पाहिल्यावर माझा भाव जागृत होतो. त्या मूर्तीत ‘राधाकृष्णा’चे तत्त्व अधिक प्रमाणात जाणवते.
मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. नंदिनी उल्हास पोकळे (वय ६२ वर्षे), कारवार, कर्नाटक. (३०.३.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !