‘Allahu Akbar’ in Varanasi :  वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे कावड यात्रेकरूंनी ‘अल्लाहू अकबर’ म्हणण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर आक्रमण  

एक यात्रेकरू गंभीररित्या घायाळ

यात्रेकरू कडक कारवाईच्या मागणीसाठी आंदोलनावर ठाम

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथे ‘हर हर महादेव’ आणि ‘बम भोले’ अशा घोषणा देत चाललेल्या कावड यात्रेकरूंना ‘अल्लाहू अकबर’ (अल्लाहू अकबर म्हणजे अल्ला महान आहे) म्हणण्यास आणि धर्मांतर करण्यासाठी धर्मांध मुसलमानांनी दबाव आणला. यात्रेकरूंनी नकार दिल्यावर त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले. यात एक यात्रेकरू घायाळ झाला. पोलिसांनी या प्रकरणी ६ मुसलमानांना अटक केली. ही घटना २८ जुलैला सायंकाळी घडली.

सौजन्य: दैनिक भास्कर

१. येथील मुख्य बाजारात शुभम् यादव आणि पलटू यादव कावड घेऊन चालले होते. या वेळी १० ते १२ मुसलमानांनी त्यांना घेरले. ‘तुम्ही मुलींना छेडत आहात’, असा खोटा  आरोप या मुसलमानांनी यात्रेकरूंवर केला, तसेच ते देत असलेल्या ‘हर हर महादेव’ आणि ‘बोल बम’ घोषणांवर आक्षेप घेतला. यातील एक मुसलमान युवक म्हणाला, ‘‘अशा घोषणा देऊ नका. तुम्ही ‘अल्लाहू अकबर’ म्हणा.’

२. यात्रेकरू याकडे दुर्लक्ष करून पुढे निघाले; पण त्यांच्यामागून मुसलमानांनी हिंदूंच्या देवतांवर अश्लील टिपणी केली. यात्रेकरूंनी याचा विरोध केल्यावर मुसलमानांनी आक्रमण केले.

३. काशीच्या बडैनीकला गावातील पीडित यात्रेकरू पलटू यादव यांनी सांगितले की, आम्ही अदलपूराहून जल घेऊन जंसा शिवमंदिराकडे जात होतो. तेव्हा आम्हाला अडवण्यात आले आणि आमच्यावर हिंदु धर्म सोडून इस्लाम स्वीकारण्याचा दबाव टाकण्यात आला. विरोध करताच धारदार शस्त्राने माझ्या डोक्यावर वार केला गेला. या वेळी शुभम् पळून जात असतांना त्यालाही पाठलाग करून मारहाण करण्यात आली.

४. घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर कावड यात्रेकरूंना शुभम् आणि पलटू यांना वाचवले अन् रुग्णालयात भरती केले. या घटनेनंतर संतप्त यात्रेकरूंनी आणि हिंदु संघटनांनी रस्त्यावर आंदोलन करत रस्ता बंद केला. पोलिसांनी घटनास्थळी पोचून परिस्थिती नियंत्रणात आणली; पण यात्रेकरू कडक कारवाईच्या मागणीसाठी आंदोलनावर ठाम राहिले. यानंतर १२ आरोपींविरोधात मारहाण, लूट, धर्मांतराचा दबाव आणि प्रलोभन देणे यांसारख्या आरोपांखाली गुन्हा नोंदवण्यात आला.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशामध्ये  योगी आदित्यनाथ यांचे सरकार असतांनाही अशी स्थिती आहे, तर अन्य राज्यांत कशी स्थिती असेल ? अशा घटना कायमच्या रोखण्यासाठीच हिंदु राष्ट्र अत्यंत आवश्यक आहे !