Gaza’s Catholic Church : इस्रायलकडून गाझामधील एकमेव कॅथॉलिक चर्चवर आक्रमण : ३ जण ठार

पंतप्रधान नेतान्याहू यांनी व्यक्त केला खेद

तेल अविव (इस्रायल) – गाझामधील एकमेव होली फॅमिली कॅथॉलिक चर्चवर १७ जुलैला टँकच्या आक्रमणात ३ जण ठार झाल्याच्या प्रकरणी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी शोक व्यक्त केला. यात एक पाद्री आणि ९ जण घायाळही झाले आहेत.

या चर्चमध्ये ६०० हून अधिक विस्थापित लोकांनी आश्रय घेतला होता. नेतान्याहू यांनी याविषयी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्याशी दूरभाषवर चर्चा केली. नेतान्याहू म्हणाले की, हे आक्रमण चुकून झाले. यामध्ये चर्चवर एक तोफगोळा पडला.

इस्रायलच्या सैन्याने दावा आहे की, त्यांनी नागरिकांची आणि धार्मिक स्थळांची हानी  होण्यापासून संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

पोप लिओ (चौदावे) यांच्याकडून शोक व्यक्त

व्हॅटिकनने या आक्रमणाचे वर्णन सैनिकी आक्रमण म्हणून केले आणि पोप लिओ (चौदावे) यांच्या वतीने शोक व्यक्त केला. पोप यांनी मृतांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि घायाळांसाठी प्रार्थना केली.