
बीजिंग (चीन) – भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेतली. गेल्या ५ वर्षांत जयशंकर प्रथमच चीनला भेट देत आहेत. जयशंकर यांनी ‘एक्स’वर जिनपिंग यांच्यासमवेतच्या भेटीशी संबंधित एक छायाचित्र प्रसारित केले आहे. जयशंकर यांनी लिहिले आहे की, आज सकाळी मी बीजिंगमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्रमंत्र्यांसह राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांच्या वतीने शी जिनपिंग यांचे अभिनंदन केले.
Called on President Xi Jinping this morning in Beijing along with my fellow SCO Foreign Ministers.
Conveyed the greetings of President Droupadi Murmu & Prime Minister @narendramodi.
Apprised President Xi of the recent development of our bilateral ties. Value the guidance of… pic.twitter.com/tNfmEzpJGl
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) July 15, 2025
त्याआधी जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी दोन्ही देशांमधील स्थिर आणि रचनात्मक संबंध निर्माण करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.
🇮🇳🤝🇨🇳 EAM Dr. S. Jaishankar Meets Xi Jinping in Beijing; First China Visit in 5 Years!
🔹Stressed need for stable, constructive ties
🔹Urged resolution of border issues
🔹Called for easing trade barriers & protecting India’s manufacturing interests pic.twitter.com/R7MEKnCnFv
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 16, 2025
जयशंकर म्हणाले की,
सीमा समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे, तसेच व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी काम केले पाहिजे. परस्पर आदर आणि समजुतीच्या आधारावर भारत-चीन संबंध सकारात्मक दिशेने जाऊ शकतात. चीनने भारताच्या उत्पादन क्षेत्राला हानी पोचवू शकणारी अशी पावले टाळावीत.
निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !