ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याचे सूत्र फेटाळून लावले !

नवी देहली – ‘ऑपरेशन सिंदूर’च्या कालावधीत भारत आणि पाक यांच्यात ४ दिवस संघर्ष झाला. भारताकडून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या आक्रमणांमुळे शेवटी १० मे या दिवशी पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचा प्रस्ताव दिला होता. त्यावर भारताने त्याच्या अटींवर शस्त्रसंधी केली, असा दावा पाकची वैचारिक संस्था (थिंक टँक) ‘पाकिस्तान-चायना इन्स्टिट्यूट’ हिने केला आहे.
१. यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचा उभय देशांमधील कथित मध्यस्थीचा दावाही फोल ठरला आहे. त्यामुळे यातून अमेरिकेच्या प्रतिष्ठेलाही गंभीर धक्का बसला आहे.
२. ‘दक्षिण अशियाला नवीन आकार देणारे १६ तास’ या शीर्षकाखाली हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
३. या अहवालामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’च्या कारवाईत तिसर्या पक्षाचा सहभाग झाला नाही. थेट पाकने संपर्क साधला आणि भारताने शस्त्रसंधी केली’, हा भारताचा दावा अधिक सशक्त झाला आहे.
ट्रम्प यांच्यावर अशा प्रकारे ओढण्यात आले आसूड !
अहवालात असेही म्हटले आहे की, अमेरिकेला दक्षिण आशियात वर्चस्व मिळवून देण्यात ट्रम्प अपयशी ठरले. अमेरिकेने मित्रराष्ट्र भारताला पाठिंबा देण्याऐवजी या सूत्रावर मध्यस्थी करण्याची भूमिका घेतली. ट्रम्प यांची ही घोषणा ही एक राजनैतिक चूक होती. यासह पाकची प्रशंसा आणि काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी यांवरील वक्तव्यांमुळे अमेरिकेने अनवधानाने चीनचा प्रभाव वाढवला आहे. यातून ‘जागतिक नेते’ म्हणून ट्रम्प यांची प्रतिमा मलिन झाली.
संपादकीय भूमिकास्वार्थांधतेने बरबटलेली अमेरिका आणि तिचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचा संधीसाधूपणा आता पाकच्याच संस्थेने दाखवला आहे. भारत सरकार हे व्यवस्थित जाणून आहे ! |
मृत्यूंजय वीर आणि शौर्यचक्राचे मानकरी हवालदार पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !