
बीजिंग (चीन) – भारतीय सैन्याचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर्. सिंह यांनी नुकतेच म्हटले होते की, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी चीनने पाकिस्तानला सक्रीय सैनिकी साहाय्य केले होते. यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांना याविषयी विचारण्यात आल्यावर त्यांनी, ‘तुम्ही उल्लेख केलेल्या विशेष सूत्राविषयी मी परिचित नाही. मी एवढेच सांगू इच्छिते की, चीन आणि पाकिस्तान यांमध्ये पारंपरिक मैत्री असून त्यांचे संरक्षण अन् सुरक्षा सहकार्य कोणत्याही तृतीय पक्षाला लक्ष्य करण्यासाठी नाही’, असे सांगत चीनने पाकला साहाय्य केल्याचे नाकारले.
माओ निंग पुढे म्हणाल्या की, हे आरोप कसे निर्माण झाले, याविषयी मला ठाऊक नाही. वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे दृष्टीकोन असू शकतात. मी एवढेच म्हणू शकते की, चीन-पाकिस्तान संबंध हे कोणत्याही तिसर्या देशाला लक्ष्य करणारे नाहीत. भारत आणि पाकिस्तान हे अशा प्रकारचे शेजारी आहेत, ज्यांना वेगळे करता येत नाही. हे दोघेही चीनचे महत्त्वाचे शेजारी आहेत.
संपादकीय भूमिकाचीन कधीही सांगणार नाही की, त्याने पाकला साहाय्य केले ! त्यामुळे चीनच्या वक्तव्याविषयी विचार करण्यात काहीच अर्थ नाही. जे सत्य आहे, ते भारताने सांगितलेच आहे ! |
मृत्यूंजय वीर आणि शौर्यचक्राचे मानकरी हवालदार पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे !
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !
US Bangladesh Military Exercise : भारताच्या बांगलादेश सीमेजवळ अमेरिकी सैनिकांसमवेत बांगलादेशाच्या सैन्याचा युद्धसराव
(म्हणे) ‘भारताला बळजोरीने लोकांना आमच्या देशात पाठवू देणार नाही !’ – Bangladesh Home Minister