
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानात हाफिज सईद मुक्त नाही. पाकिस्तानने त्याच्यावर कारवाई केली आहे. मसूद अझहर याच्याविषयी आम्हाला काहीच माहिती नाही. अफगाण जिहाद्यांसमवेतचा त्याचा भूतकाळ पाहिल्यावर आम्हाला तो अफगाणिस्तानात आहे, असे वाटते. जर भारत सरकारने आम्हाला मसूद पाकिस्तानच्या भूमीवर असल्याची माहिती दिली, तर आम्ही त्याला अटक करण्याचे आश्वासन देतो आणि आम्हाला तसे करायला आनंद होईल, असे विधान पाकचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी केले. तो सध्या अफगाणिस्तानमध्ये असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. (जर मसूद अझहर अफगाणिस्तानमध्ये आहे, तर भारत तालिबानी सरकारशी चर्चा करून त्याला भारताच्या कह्यात देण्यास का सांगत नाही ? – संपादक) जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा प्रमुख असणारा मसूद अझहर पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आहे.
🇵🇰 "We’ll act if India gives info on Masood Azhar" – Pakistan’s hollow words again!
Ex-FM Bilawal Bhutto claims Azhar is “probably in Afghanistan,” denying he's in Pak.
📍 India already hit Jaish HQ in Bahawalpur, killing 10 of Azhar’s family & aides.
No matter how much info… pic.twitter.com/A4chKIIJOF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 5, 2025
भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी पाकिस्तानमधील बहावलपूर येथील जैशच्या मुख्यालयावर आक्रमण केले होते. त्यात मसूद अझहरने स्वतः मान्य केले की, भारताच्या क्षेपणास्त्र आक्रमणात त्याचा भाऊ, बहीण, नात आणि ४ मुले मारली गेली.
संपादकीय भूमिकाभारताने कितीही माहिती दिली, तरी पाक असे कधी करणार नाही, हाच आतापर्यंतचा इतिहास राहिला आहे. तसेच अशांना अटक करण्यापेक्षा भारताने इस्रायलप्रमाणे कारवाई करून त्यांना ठार मारले पाहिजे ! |
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !
US Bangladesh Military Exercise : भारताच्या बांगलादेश सीमेजवळ अमेरिकी सैनिकांसमवेत बांगलादेशाच्या सैन्याचा युद्धसराव