|
नवी देहली – कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचा दावा सतत केला जात आहे. तरुण वयातही अचानक येणार्या हृदयविकाराच्या झटक्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस कारणीभूत असल्याचा दावे केला जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले की, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्था यांनी यांनी कोरोनानंतर प्रौढांमध्ये अचानक होणार्या मृत्यूंविषयी अभ्यास करून केला. अभ्यासाअंती कोविड प्रतिबंधक लस आणि अचानक होणारे मृत्यू, यांचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Govt Clarifies: No Link Between COVID Vaccines & Sudden Heart Deaths! 💉🫀
ICMR & AIIMS studies find no evidence connecting vaccines to sudden fatalities. ✅
India's COVID-19 vaccines remain safe, effective, with rare serious side effects. 🇮🇳
pic.twitter.com/O9CmIIgdYc— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 2, 2025
भारतात कोविड-१९ प्रतिबंधक लस सुरक्षित आणि प्रभावी !
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पुढे म्हटले की, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र यांनी केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, भारतात कोविड-१९ प्रतिबंधक लसी सुरक्षित आणि प्रभावी आहेत. त्यांचे गंभीर दुष्परिणाम होणे, हे अत्यंत दुर्मिळ आहे. मे ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत देशातील १९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांमधील ४७ रुग्णालयांमध्ये हा अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास अशा लोकांवर करण्यात आला, जे आधी पूर्णपणे निरोगी होते; परंतु ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२३ या कालावधीत त्यांचा अचानक मृत्यू झाला.
विविध कारणांमुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो !
तज्ञांनी असेही स्पष्ट केले की, आनुवंशिकता, जीवनशैली, आधीपासून असलेल्या आरोग्याच्या समस्या आणि कोविडची लागण झाल्यानंतर निर्माण झालेली गुंतागुंत, यांच्यासह विविध घटकांमुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होऊ शकतो. विविध कारणांमुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. कोविड प्रतिबंधक लसीकरण आणि हृदयविकाराच्या झटक्यामुळे होणारे अचानक मृत्यू यांचा एकमेकांशी थेट संबंध जोडणे चुकीचे आहे. त्यामुळे या मृत्यूंविषयी केली जाणारी विधाने खोटी आणि दिशाभूल करणारी आहेत.
कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला होता आरोप !

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कोविड लसीला घाईघाईने मान्यता देणे आणि त्याचे लोकांमध्ये वाटप करणे, हे हृदयविकाराच्या झटक्यामुळे होणार्या मृत्यूंचे कारण असू शकते, असा आरोप केला होता. त्यानंतर केंद्र सरकारकडून वरील स्पष्टीकरण देण्यात आले. गेल्या ४० दिवसांत कर्नाटकातील हासन जिल्ह्यात किमान २२ जणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यांपैकी ५ जण १९ ते २५ या वयोगटांतील होते. बहुतेक मृत्यू कोणतीही लक्षणे नसतांना झाले. अनेक लोक घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी अचानक कोसळले.

देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !