
फोंडा, २९ जून – छत्रपती संभाजी महाराज यांनी अंत्रुज महालातील हिंदू आणि मंदिरे यांचे संरक्षण करण्यासाठी पोर्तुगिजांच्या विरोधात निर्भीडपणे लढा दिला. या लढ्यात मर्दनगडाचे महत्त्वाचे योगदान आहे. २८ जून १७५६ या दिनांकालाच पोर्तुगिजांनी मर्दनगडावर केलेल्या आक्रमणात मराठ्यांच्या हातून लुईस मास्कारेन्हस काउंट द अल्वा हा पोर्तुगीज व्हॉइसरॉय मारला गेला. या पराभवाचा राग आणि पुन्हा पुन्हा मराठ्यांचे संकट पोर्तुगीज सत्तेवर नको, यासाठी नंतरच्या काळात पोर्तुगिजांनी हा मर्दनगड किल्लाच पूर्णपणे उद्ध्वस्त केला. त्यामुळे आपण आपल्या पूर्वजांच्या इतिहासाचे स्मरण करण्यासाठी मर्दनगडाला पुन्हा उर्जितावस्था आणली पाहिजे.

आमच्या पूर्वजांचे शौर्य पुढील पिढीपर्यंत पोचवण्यासाठी किल्ल्याचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन इतिहासकार श्री. सचिन मदगे यांनी केले. मर्दनगड संवर्धन समितीच्या वतीने किड्स नेस्ट स्कूल सभागृह, फोंडा येथे ‘छत्रपती संभाजी महाराज आणि मर्दनगडाचा इतिहास’ या विषयावर श्री. मदगे मार्गदर्शन करतांना बोलत होते.
या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि म्हार्दाेळ येथील श्री. राजेंद्र देसाई उपस्थित होते.
मर्दनगडाचे संवर्धन होईपर्यंत वैध मार्गाने लढा द्यावा लागणार ! – श्री. रमेश शिंदे
मर्दनगड संवर्धन समितीच्या पुढील कार्याची दिशा स्पष्ट करतांना श्री. रमेश शिंदे म्हणाले, ‘‘आता आपण संघटित होऊन मर्दनगडाचे संवर्धन करण्याचा संकल्प करूया आणि तो पूर्ण होईपर्यंत स्वस्थ बसायचे नाही. जुने गोवे येथील शवप्रदर्शन सोहळ्यासाठी ३०० कोटी रुपये दिले जातात, फर्मागुडी येथे प्रत्यक्ष किल्ला नसतांनाही तेथे डिजिटल म्युझियमसाठी १०० कोटी रुपये संमत होतात, तर मग छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेल्या एकमेव ऐतिहासिक मर्दनगडाच्या संवर्धनासाठी का निधी मिळणार नाही ? मर्दनगडाचे संवर्धन होईपर्यंत वैध मार्गाने आम्हाला आता लढा द्यावा लागणार आहे. या मोहिमेची पुढील दिशा ठरवण्यासाठी मंगळवार, १ जुलै या दिवशी सायंकाळी ७ वाजता श्री केशव देवस्थान, पंडितवाडा, फोंडा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.’’
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. मनोज गावकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला, तर कार्यक्रमाच्या शेवटी आभारप्रदर्शन श्री. राजेंद्र देसाई यांनी केले. या कार्यक्रमाला अंदाजे ११० नागरिक उपस्थित होते.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !