
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमधील जिहादी आतंकवादी संघटना पाकिस्तानी सैन्याच्या साहाय्याने नियंत्रण रेषेजवळील घनदाट जंगलात आतंकवाद्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे छोटे प्रशिक्षण तळ बांधत आहेत. भारतीय सैन्यापासून वाचण्यासाठी हे तळ बांधले जात आहेत. लुनी, पुटवाल, तैपू पोस्ट, जमीला पोस्ट, उमरानवाली, चपरार, फॉरवर्ड कहूटा, छोटा चक आणि जंगलोरा यांसारख्या भागात हे तळ बांधले जात आहेत. यामध्ये थर्मल इमेजर्स, जंगल पाळत ठेवणारे रडार आदी तंत्रज्ञान वापरले जात आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारतीय सैन्याने पाक सैन्य आणि आतंकवादी यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाककडून यांची निर्मिती केली जात आहे. यापूर्वी पाकच्या सैन्याचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी भारताच्या आक्रमणात उद्ध्वस्त झालेले आतंकवादी तळ ३० जूनपर्यंत दुरुस्त करण्याचा आदेश दिला होता.
१७ लाँच पॅडही बांधले जात आहेत !
याखेरीज पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरमध्ये पुन्हा १३ लाँचपॅड विकसित करत आहे. यामध्ये केल, शारदी, दुधनियाल, अथमुकम, जुरा, लिपा व्हॅली, पचिबन चमन, तांडापानी, नैयाली, जनकोट, चाकोटी, निकेल आणि फॉरवर्ड कहूता यांचा समावेश आहे. तसेच जम्मू सेक्टरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर मसरूर बडा भाई, चपरार, लुणी आणि शकरगड येथे ४ लाँचपॅड बांधले जात आहेत.
भारताच्या कारवाईच्या भीतीने मोठ्या तळांऐवजी लहान तळ बांधण्यात येत आहेत. यामुळे भारताने कारवाई केली, तरी अधिक हानी होणार नाही, असा विचार आहे. यांच्या सुरक्षेसाठी पाकचे सैन्य तैनात केले जाणार असून त्यांची अत्याधुनिक यंत्रणा असणार आहे.
संपादकीय भूमिकाकाश्मीर आणि एकूणच भारतातील आतंकवाद नष्ट करण्यासाठी या तळांवरून प्रशिक्षण घेतलेले आतंकवादी भारतात घुसून कारवाया करण्यापूर्वीच भारताने या तळांना पुन्हा उद्ध्वस्त केले पाहिजे. आक्रमणानंतर याऐवजी आक्रमणापूर्वीच कारवाई करणे, देशाच्या रक्षणासाठी आता अधिक योग्य ठरणार आहे. |
मृत्यूंजय वीर आणि शौर्यचक्राचे मानकरी हवालदार पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !