पुरी पीठाचे श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे मार्गदर्शन

नवी देहली – भारताचा विकास झाला पाहिजे; पण तो मानवजातीच्या हिताचा असला पाहिजे. भारताच्या विकासात ‘भारतीयत्व सर्वोपरि’ असले पाहिजे. उपजीविका ही जीवनासाठी असली पाहिजे; पण जीवन उपजीविका बनू नये, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. केवळ पोट आणि कुटुंब यांपुरते मर्यादित राहू नका, देशाच्या विकासात अन् धर्म आणि अध्यात्म यांच्या उन्नतीत योगदान द्या, असे मार्गदर्शन पुरी पीठाचे श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी केले. त्यांचा ८३ वा जयंती महोत्सव येथे नुकताच साजरा करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते.

शंकराचार्यांच्या मंगलमय उपस्थितीत ‘राष्ट्रोत्कर्ष दिना’चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी देहलीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, भाजप खासदार संबित पात्रा, माजी खासदार डॉ. सुब्रमण्यम् स्वामी, प्रसिद्ध कथाकार देवकीनंदन ठाकूर आदी उपस्थित होते.

शंकराचार्य पुढे म्हणाले की, कोणत्याही समाजाच्या विकासासाठी सरकारवर पूर्णपणे अवलंबून रहाणे योग्य नाही. जर सनातन धर्म टिकला, तर मानवांचे कल्याण होईल, जगात शांती येईल, भारत पुन्हा जागतिक नेता होईल. भारतात निःपक्षपाती सनातन धर्म व्यवस्था कशी स्थापित करायची ?, याविषयी सर्वांमध्ये जागृती करावी लागेल.
| श्रीमदजगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती जी महाराज के 83वें प्राकट्योत्स्व “
(सौजन्य : Govardhan Math, Puri) |

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची मुंबईत सभा !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मंगळुरू सेवाकेंद्रातील साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा