(श्रावण मासामध्ये उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांत शिवभक्त भगवेवस्त्र परिधान करून गंगानदीसह अन्य पवित्र नद्यांमधून कावडद्वारे जल आणून स्थानिक शिवमंदिरात जलाभिषेक करतात.)

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कावड यात्रा, मोहरम आणि रथयात्रा यांसारख्या उत्सवांसाठी सूचना दिल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी अधिकार्यांना कठोर पावले उचलण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, कावड यात्रेच्या मार्गांवर मांसाविक्रीवर पूर्णपणे बंदी असेल. प्रक्षोभक घोषणा देणे, शस्त्रांचे प्रदर्शन किंवा धार्मिक तणाव पसरवण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही.
भड़काऊ नारे, हथियार प्रदर्शन कतई बर्दाश्त नहीं: मुख्यमंत्री श्री @myogiadityanath जी महाराज pic.twitter.com/2HpzymGpJP
— Yogi Adityanath Office (@myogioffice) June 26, 2025
१. मुख्यमंत्र्यांनी अधिकार्यांना कावड मार्गावर स्वच्छता, पथदिवे, पिण्याचे पाणी, शौचालये आणि आरोग्य सेवा, यांसाठी योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. स्थानिक प्रशासनाला कावड संघटनांशी सतत संपर्कात रहाण्यास आणि सर्व व्यवस्थांचा पूर्वआढावा घेण्यास सांगितले. मोहरमच्या मिरवणुकांसाठी सुरक्षा आणि संवाद यांवरही भर देण्यात आला. डीजे (मोठी संगीत यंत्रणा), ताजिया (इमाम हुसेन यांच्या समाधीची प्रतिकृती) आणि रथांची उंची निश्चित मानकांनुसार असेल आणि ध्वनीमर्यादादेखील नियंत्रित केली जाईल.
२. सामाजिक माध्यमांवरील अफवा आणि चुकीची माहिती यांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात केली जातील. या बैठकीला पोलीस महासंचालक, गृह विभागाचे मुख्य सचिव यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
हवामान खात्याचा नव्हे, तर पंचांगाचा अंदाज खरा ठरला ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा सुनील कच्छवे यांनी पदभार स्वीकारला !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय