४० वर्षांत १० लाखांहून अधिक गोमातांचे रक्षण करणारे पंजाब गोरक्षक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश कुमार !

७ नोव्हेंबर १९६६ या दिवशी गोहत्येच्या निषेधार्थ आंदोलन करणार्‍या साधूसंतांवर इंदिरा गांधी यांनी गोळ्या चालवून शेकडो साधुसंतांना ठार केले. त्यानंतरही भारतभरात उघडपणे पशूवधगृहांमध्ये गायींची हत्या चालू आहे. ज्या हिंदु संस्कृतीमध्ये गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे, त्याच हिंदूंच्या देशात लक्षावधी गायींची हत्या प्रतिदिन होत असतांना पहावे लागत आहे; पण अशाही परिस्थितीत या देशात शेकडो गोरक्षक स्वत:चा जीव पणाला लावून गायींचे प्राण वाचवण्यासाठी अहोरात्र धडपडत आहेत. त्यापैकीच पंजाब गोरक्षक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सतीश कुमार हे एक आहेत. त्यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह गेल्या ४० वर्षांत १० लाखांहून अधिक गायींचे कसायांपासून प्राण वाचवले आहेत. गोरक्षणासाठी लढतांना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांच्यावर अनेक आक्रमणे झाली. त्यात ते आणि त्यांचे सहकारी अनेक वेळा घायाळ झाले, तर काही प्राणालाही मुकले. हे कार्य करत असतांना गोरक्षक श्री. सतीश यांच्यावर पोलिसांकडून २५ हून अधिक गुन्हे प्रविष्ट (दाखल) झाले, तसेच त्यांना कारागृहातही जावे लागले; पण ते मागे हटले नाहीत. ‘कसायांपासून गायींचे रक्षण करणे आणि ते करतांना मरण पत्करणे’, हेच त्यांच्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे. ‘भारतात गोहत्या बंदी लागू होण्यापूर्वी त्यांना मरण आले, तर त्यांच्या देहाची राख गंगेत विसर्जित न करता गोहत्या बंदी होईपर्यंत गोशाळेतच ठेवावी’, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

श्री. सतीश कुमार

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक

१. गायींविषयी लहानपणापासून प्रेम

संत बाबा सर्वनदासजी महाराज

श्री. सतीश कुमार यांना लहानपणापासून गायींविषयी प्रेम आहे. ते गायीला स्वत:ची माता समजतात. त्यांना संत बाबा सर्वनदासजी महाराज यांच्याकडून प्रेरणा मिळाली. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य गायींसाठी समर्पित केले होते. भारतातील सर्व गायी कसायांपासून वाचवण्याचे दायित्व संत बाबा सर्वनदासजी महाराज यांनी श्री. सतीश कुमार यांना दिले आहे. श्री. कुमार यांच्याकडे गोरक्षकांचे जाळे (नेटवर्क) आहे. त्यांच्या माहितीच्या आधारे ते गोरक्षणाच्या मोहिमा यशस्वी करतात. गोरक्षण करतांना त्यांनी अनेक धाडसी पावले उचलली आहेत. त्यामुळे त्यांना अनेक वेळा खोट्या गुन्ह्यांमध्येही अटक करण्यात आली होती.

२. कारागृहात राहून साधना आणि ग्रंथांचे लिखाण

गोरक्षणाच्या एका प्रकरणात श्री. सतीश कुमार यांना २४ ऑगस्ट २०१६ या दिवशी अटक झाली आणि ३ वर्षे कारागृहात रहावे लागले. अटक झाली, तो दिवस श्रीकृष्णजन्माष्टमीचा होता. तेव्हा ‘भगवान श्रीकृष्णही कारावासातच प्रकट झाले होते. त्यामुळे भगवान श्रीकृष्णालाच भेटायला जात आहे’, असा त्यांचा भाव होता. त्यांनी कारागृहात मिळालेल्या एकांतवासाचा आध्यात्मिक साधनेसाठी लाभ करून घेतला. तेथे त्यांनी ध्यान, धारणा आणि भगवंताचे नामस्मरण केले. कारागृहात त्यांनी इतिहास, वेद आणि शास्त्र यांचा अभ्यास केला, तसेच ५ ग्रंथ लिहिले आणि गोमातेवर १ सहस्रहून अधिक कविता केल्या.

(चित्रावर क्लिक करा)

३. अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनांमध्ये सहभाग

गोरक्षक श्री. सतीश कुमार हे गोवा येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित करत असलेल्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनां’मध्ये सहभागी होतात. ते समितीविषयी गौरवोद्गार काढतांना म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांपासून हिंदु जनजागृती समिती भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. गोव्याच्या भूमीत होणार्‍या ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’तून हिंदु राष्ट्राची मागणी चालू झाली होती. आता ती देशभरातून करण्यात येत आहे.’’

⛳️ वैश्विक हिन्दू राष्ट्र महोत्सवात त्यांनी व्यक्त केलेले विचार ⛳️

गौतस्करी का संबंध आतंकवाद से है ! – श्री. सतीश कुमार | Shri. Satish Kumar

४. प्रयागराज येथील कुंभमेळ्यामध्ये सनातनच्या प्रदर्शन कक्षाला भेट

गोरक्षक श्री. सतीश कुमार यांनी प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याच्या वेळी सनातन संस्थेच्या सेक्टर ९ मधील प्रदर्शनकक्षाला भेट दिली. या वेळी त्यांनी ‘हिंदु राष्ट्र झाल्यानंतर देशातील गोहत्या निश्चित थांबतील’, असे सांगितले.

५. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त सहभाग

१७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोवा येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला ते उपस्थित होते. या वेळी त्यांनी उपस्थित समुदायाला संबोधित केले.

श्री. सतीश कुमार यांचे जाज्वल्य विचार !

श्री. सतीश कुमार

♦ ज्या भूमीवर गायीची हत्या केली जाते, ती भूमीही दुभंगली जाईल. त्यामुळे आपल्याला अखंड भारत हवा असेल आणि पुढील फाळणी थांबवायची असेल, तर गोहत्या थांबवणे आवश्यक आहे.

♦ युद्धाविना काहीही मिळत नाही. पांडवांना केवळ ५ गावांसाठी युद्ध करावे लागले. आपल्याला ‘हिंदु राष्ट्र’ हवे आहे. त्यामुळे लढले पाहिजे. मृत्यू हा प्रत्येकाला येणारच आहे. त्यामुळे धर्माचे कार्य करायचे असेल, तर भीती सोडून दिली पाहिजे.

Punjab News: ईद को लेकर कुर्बानी पर क्या बोले गौ रक्षा दल के राष्ट्रीय प्रधान सतीश कुमार


(सौजन्य : PunjabKesari.Com)

♦ गेल्या ६३ वर्षांत भारतात अनुमाने ७५ कोटी गायींची हत्या करण्यात आली. भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्या नियंत्रणाखाली ३० सहस्रांहून अधिक पशूवधगृहे चालवली जात आहेत. त्यावर त्वरित बंदी घातली पाहिजे.

भेट द्या → Gau Raksha Dal : फेसबूक लिंक https://www.facebook.com/profile.php?id=100069492798663

६. देशात सर्वप्रथम हिंदु राष्ट्राची मागणी करणारी सनातन संस्था ! – सतीश कुमार

श्री. सतीश कुमार

सनातन संस्थेचा मला १४ वर्षांपासून परिचय आहे. जेव्हा कुणाच्या मनातही हिंदु राष्ट्राविषयी विचार नव्हते, त्या वेळी भारतात हिंदु राष्ट्राची मागणी करणार्‍यांमध्ये सनातन संस्था अग्रणी होती. आता तीच मागणी प्रत्येक सनातनी हिंदूच्या मुखात आहे. प्रत्येक जागरूक हिंदूंला ‘हिंदु राष्ट्र्र व्हावे’, असे वाटत आहे.

🪷हिंदुत्वाचे शिलेदार या सदरामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या मान्यवरांची माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा !🪷