|

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) : येथे ८ कोटी रुपये खर्च करून नवीन बसस्थानक उभारण्यात आले होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे बसस्थानकात अनेक ठिकाणी पाणी गळत आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. नवीन बसस्थानकाच्या निकृष्ट बांधकामाची चौकशी करून दोषींवर गुन्हे नोंद करावे, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने ३ जून या दिवशी बसस्थानकासमोर ‘बोंब मारो’ आंदोलन करण्यात येणार आहे.
१. प्रथमपासूनच वादग्रस्त ठरलेल्या बसस्थानकाचे बांधकाम निकृष्ट, तसेच चुकीच्या रचनेमुळे उद्घाटनानंतरही वादग्रस्त ठरले होते. बसस्थानकात सर्वच बाजूने पावसाचे पाणी येत आहे.
२. यामुळे बसस्थानकात पाणी येत असल्याने आडोसा शोधावा लागत आहे. बसस्थानकात प्रवाशांना उभेही रहाता येत नाही.
३. जुने बसस्थानक पाडून नवीन बसस्थानक बांधकामासाठी प्रारंभी ३ कोटी ६१ लाख रुपये खर्च अपक्षित होता; मात्र आश्चर्यकारकपणे बसस्थानक बांधकामाचा खर्च ८ कोटी रुपयांपर्यंत गेल्याचे सांगण्यात येत आहे.
४. निविदा रकमेपेक्षा दुहेरी खर्च दाखवून शासन आणि एस्.टी महामंडळ यांची फसवणूक केली आहे, असा आरोप करत संबंधित सर्व अधिकार्यांसह ठेकेदारावर गुन्हे नोंद करण्याची मागणी महाविकास आघाडीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
५. या निवेदनावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, युवक नेते ऋषिकेश मगर, अमोल कुतवळ, शिवसेना ठाकरे गटाचे श्याम पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
| ८ कोटींच्या बसस्थानकाची लाजिरवाणी दुरवस्था; तुळजापूरच्या प्रवाशांना शासनाचा ‘गळती’मंत्र!
(सौजन्य : Dharashiv Live) |
संपादकीय भूमिकाकोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या या बसस्थानकाच्या बांधकामाची कुणी पडताळणी केली नाही का ? संबंधितांचे उत्तरदायित्व निश्चित करून कठोरात कठोर कारवाई करून सर्व खर्च त्यांच्याकडून वसूल करणे आवश्यक आहे. |
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !