‘पू. काशीनाथ कवटेकर हे कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकारांपैकी एक आहेत. त्यांचा जन्म २ जानेवारी १९४४ या दिवशी शिवमोग्गा जिल्ह्यातील शिकारीपूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णराव आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित परंपरेनुसार शिल्पकलेत लक्ष केंद्रित केले. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी त्यांचे आजोबा परशुराजप्पांकडून लोखंड आणि शिल्पकलेचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी तमिळनाडूला जाऊन तेथील प्रसिद्ध देवळांच्या गोपुरांचे अध्ययन केले. सध्या ते शिवमोग्गा आणि बेंगळुरू येथे ‘काशीनाथ कला मंदिर’ या गुरुकुल पद्धतीच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिल्पकलेचे शिक्षण देत आहेत. त्यांचा सहवास मिळाल्यावर भक्तांना आनंद आणि उत्साहाचा अनुभव येतो. पू. गुरुजींची साधना आणि त्यांनी शिल्पकलेचे दिलेले योगदान कर्नाटकाच्या शिल्पकला परंपरेत सदैव संस्मरणीय असे राहील. पू. काशिनाथ कवटेकर यांची आध्यात्मिक साधना आणि भगवंतावरील त्यांची अपार श्रद्धा यांमुळेच सनातन संस्थेने त्यांना वर्ष २०२३ मध्ये ‘संत’ म्हणून घोषित केले.

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक
१. शिल्पकलेकडे कसे वळले ?
पू. कवटेकरगुरुजी यांना लहानपणापासून चित्रकलेचे वातावरण लाभले. तेव्हापासून त्यांना चित्रकलेची आवड निर्माण झाली. लहान असतांनाच मंदिरातील मूर्ती त्यांना आकर्षित करून घेत असत. ते देवळातील मूर्तीमध्ये रममाण होत असत. शालेय शिक्षण घेत असतांना काशिनाथगुरुजी यांना शिक्षणापेक्षा चित्रकलेत अधिक रुची होती. ते शाळेत जाण्यास टाळाटाळ करत असल्याने त्यांनी त्यांच्या वडिलांच्या हातचा मारही खाल्ला आहे. त्यांनी अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावे आणि पुष्कळ शिकून नोकरी करावी, असे त्यांच्या वडिलांना वाटत असे. याउलट त्यांचे आजोबा त्यांना चित्रकलेसाठी प्रोत्साहन देत असत. काशिनाथ शाळेत गेला, तरी मुलांना हत्ती, पोपट आदी चित्र काढून दाखवत असे. ते कसेतरी ४ थीपर्यंत शिकले. शेवटी त्यांना आजोबांकडे चित्रकला शिकण्यास पाठवण्यात आले. त्यांचे आजोबा मूर्तींना रंग देत असतांना ते त्यांच्याकडे जात असत.
पू. गुरुजींच्या शिल्पकलेला ईश्वराचे अधिष्ठान !

पू. गुरुजींविषयी बोलतांना त्यांचे शिष्य आणि सहकारी सांगतात की, ते शिल्पनिर्मिती करत असतांना त्यांच्या कामात संपूर्णपणे एकरूप होतात, जे त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक आहे. ते मूर्ती बनवण्यापूर्वी ज्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे, तेथे जाऊन बसायचे आणि ईश्वराने प्रेरणा दिल्यावरच त्याचे प्रारूप द्यायचे. ते देवाला, ‘मी निमित्त असून तूच माझ्या हृदयात बसून कृती करवून घे’, अशी प्रार्थना करायचे.

बेंगळुरूमध्ये पू. गुरुजींनी भगवान शंकराची एक मूर्ती बनवली होती. ती मूर्ती पाहून एका महिलेचा पुष्कळ भाव जागृत झाला. तिने सांगितले की, ‘ही मूर्ती इतकी सुंदर आहे की, येथे साक्षात् शिवच उभे आहेत, असे वाटते.’
त्यांच्या आजोबांचे वडीलही मोठे चित्रकार होते. त्यांनी चित्रकलेसाठी राजे मुम्मडी कृष्णराज वाडियार यांच्याकडून सोन्याचे पदक प्राप्त केले होते. ‘त्यांचे चित्र राजाच्या महालात आहे, तसेच त्यांनी काढलेले चित्र लंडनपर्यंत पोचले आहे. त्यामुळे तूही तसेच प्रयत्न केले पाहिजेत’, असे त्यांचे आजोबा लहान काशीनाथ यांना सांगत असत.
आजोबांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी १२ व्या वर्षी लाकडावरील कोरीव काम चालू केले. त्यांचे आजोबा दिवसा लाकडावरील काम आणि रात्री चित्रकला शिकवायचे. त्याच वेळी ते चांदीचा पत्रा बनवणे शिकले. २० व्या वर्षीच त्यांच्यामध्ये उत्तम गणेशमूर्ती बनवण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला होता; परंतु त्यांच्यावर लोकांचा विश्वास नव्हता. एक दिवस त्यांनी चित्रावरून ६ फूट उंचीची सुंदर गणेशमूर्ती ७ दिवसांत बनवली. त्यानंतर समाजात त्यांना मानसन्मान मिळू लागला. तेव्हापासून ते मूर्तीकार झाले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती पू. काशीनाथ कवटेकर यांचा भाव !

‘रथ बनवत असतांना तो प.पू. गुरुदेवांना विचारून घ्या. ते म्हणतील तसेच आपण करूया’, असे ते रथनिर्मितीतील साधकांना सांगत असत. त्यांना इतके ज्ञान असूनही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित विष्णुतत्त्व रथात येण्यासाठी रथाच्या चित्रात पालट केल्यास ते स्वीकारत असत.
पू. काशीनाथ कवटेकरगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासाठी काष्ठरथाची निर्मिती

सप्तर्षींनी नाडीपट्टीत म्हटल्यानुसार सनातनच्या साधकांनी पू. काशीनाथ कवटेकरगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासाठी काष्ठरथ बनवला. साधकांना ‘रथ कसा बनवतात ?, याविषयी काहीच माहिती नव्हती; परंतु पू. कवटेकरगुरुजी यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे हा रथ साकार होऊ शकला.
| हे ही वाचा → |
२. पू. कवटेकरगुरुजी यांचे शिल्पकला क्षेत्रात मोठे योगदान
कर्नाटकमधील शिल्पकला क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. दगड, सिमेंट, चांदी आणि सोने यांचा वापर करून शिल्पनिर्मिती करण्यात त्यांचे प्राविण्य आहे. मंदिरांच्या गोपुरांच्या बांधकामातही त्यांनी मोठे नाव कमावले आहे. कुंदापूर येथील श्री कुंदेश्वर मंदिर, आनेगुड्डे श्री गणपती मंदिर, धर्मस्थळ येथील श्री मंजुनाथस्वामी मंदिर यांसारख्या शेकडो मंदिरांच्या गुढ्या, गोपुरे आणि शिखरे यांच्या निर्मितीत त्यांनी कला साकारली आहे. पू. कवटेकर यांनी शेकडो मंदिरांच्या गुढ्या आणि गोपुरे यांच्यावर त्यांच्या शिल्पकलेची मोहोर उमटवली. विशेषतः हिमाचल प्रदेशातील धर्मशाळेजवळ असलेल्या सिद्धबारी येथे ३५ फूट उंचीची वीराञ्जनेय मूर्ती, बेंगळुरू विमानतळ मार्गावरील केंपफोर्ट येथील शिवमूर्ती, नेलमंगला येथील विश्वशांती आश्रमातील १०८ फूट उंच गीतोपदेश मूर्ती आणि ४० फूट उंच श्रीकृष्णाचे विश्वरूप दर्शन या त्यांच्या महत्त्वाच्या शिल्पकृती आहेत.
| कन्नड भाषेतील पू. काशीनाथ कवटेकर यांच्या शिल्पकलेसंदर्भातील दोन माहितीपट (डॉक्युमेंट्रीज) जिज्ञासू पाहू शकतात –
♦ Sri Kashinath.K.Shilpi Documentry Part 1 ← क्लिक करा ♦ Sri Kashinath K Shilpi Documentary Part 2 ← क्लिक करा |
त्यांच्या सर्वोत्तम कलाकृतींपैकी एक म्हणजे, मुरुडेश्वर येथे उभारलेली १२३ फूट उंच ध्यानस्थ शिवमूर्ती. ही मूर्ती जगातील दुसर्या क्रमांकाची सर्वांत उंच शिवमूर्ती समजली जाते. ही मूर्ती त्यांच्या अद्वितीय शिल्पकलेचे प्रतीक आहे. गुजरात येथे ८० फूटाचा मारुति, चित्रकूट येथे ५० फूट उंचीची मारुतीची मूर्ती इत्यादी मूर्ती बनवून त्यांची सर्वत्र मूर्तीकलेचा ठसा उमटवला आहे. रथ आणि देवांचे मुखवटे यांच्या निर्मितीतही त्यांना मोठा अनुभव आहे. त्यांनी बेंगळुरूमधील वसंत वल्लभराय मंदिरासाठी १५ फूट उंचीचा रथ, उक्कडगात्रे येथील करिबसवेश्वर मंदिरासाठी १५ फूट उंचीचा रथ, कापू मरिकांबा मंदिरासाठी सोन्याचा मुखवटा इत्यादी कलाकृती बनवल्याची काही उदाहरणे सांगता येतील.
पू. काशीनाथ कवटेकर यांचा संदेश !

कोणतेही काम करतांना त्यात भाव, भक्ती, श्रद्धा आणि चिकाटी असावी लागते. गुरुंच्या कृपेनेच सर्व काही होत असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला ओळखले आणि आध्यात्मिक बळ दिले, त्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता !
३. विविध पुरस्कारांनी गौरवान्वित
पू. गुरुजींच्या शिल्पकलेतील योगदानामुळे त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. वर्ष १९९८ मध्ये ‘कर्नाटक शिल्पकला अकादमी गौरव पुरस्कार’, वर्ष २००४ मध्ये ‘अमरशिल्पी जकणाचारी पुरस्कार’, ‘शिल्पकला अकादमी पुरस्कार २०००’, कर्नाटक सरकारकडून ‘कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार २०१६’ आदी प्रथितयश पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
ही आहे राजकीय पक्षांची दु:स्थिती !
‘श्रद्धे’चा बाजार !
‘जीवोत्तम विद्यापीठ’ : भारतीय ज्ञानपरंपरेचे आधुनिक पुनरुज्जीवन !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट
खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
घरात आश्रमाची अनुभूती देणारे पलूस (सांगली) येथील बर्गे कुटुंबीय !