गुरुद्वारावर डागले तोफगोळे

जम्मू (जम्मू-काश्मीर) – भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकमधील आतंकवादी तळांवर कारवाई केल्यानंतर चवताळलेल्या पाकच्या सैन्याने जम्मूतील पुंछमधील नियंत्रण रेषेवर गोळीबार करत तोफगोळेही डागले. पाकने या भागातील निवासी क्षेत्रे, सरकारी इमारती आणि सार्वजनिक ठिकाणी हा गोळे डागले. यात १२ नागरिकांचा मृत्यू झाला, तर ४० हून अधिक जण घायाळ झाले. या आक्रमणात एका भारतीय सैनिकाला वीरमरण आले. पाकिस्तानी सैन्याने येथील गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा साहिबवर तोफगोळे डागले. यात ३ जणांचा मृत्यू झाला. शिरोमणी अकाली दलाने पाकिस्तानी सैन्याच्या या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध केला.
Pakistan Attack in Poonch: Pakistan fired on the Jammu-Kashmir border after 'Operation Sindoor'.
Twelve civilian casualties, 43 injured
Shells were fired at a Gurudwara too#PoonchAttack#IndiaPakistanWar #JammuAndKashmir#OperationSindoor2 pic.twitter.com/CWC6K6Waa4
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 8, 2025
१. काश्मीरमध्ये उरी आणि तंगधार सेक्टर येथेही पाककडून गोळीबार करण्यासह तोफगोळे डागण्यात आले. गेल्या १३ दिवसांपासून पाककडून जम्मू-काश्मीरच्या सीमेवर सलग गोळीबार करण्यात येत आहे.
२. जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा, बारामुला, बडगाम, जम्मू, कठुआ, कुपवाडा, राजौरी, सांबा येथे, तर पंजाबमधील अमृतसर, फाजिल्का, फिरोजपूर, गुरुदासपूर, पठाणकोट, तरन-तारन येथे गोळीबार करण्यात आला.
३. पाकिस्तानच्या गोळीबारामुळे राजस्थान आणि गुजरात येथील पाक सीमेवर सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin