सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘बर्याचदा माझ्या मनात अकारण चिंतांचे काहूर माजते. त्यामुळे या गोष्टीचा मला पुष्कळ त्रास होऊ लागतो. त्या वेळी मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी पुढील प्रार्थना सतत करू लागलो, ‘मला साधनेसाठी बळ द्या.’ त्यानंतर अनुमाने २ वर्षांपूर्वी एकदा दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आलेली माझी अनुभूती मला आठवली. त्या अनुभूतीच्या कालावधीत सलग ४ – ५ दिवस देवपूजेनंतर नेहमीच्या प्रार्थनेऐवजी माझ्याकडून पुढील प्रार्थना आपोआप झाली होती, ‘हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव तुम्हाला अपेक्षित तेच सारे काही माझ्या जीवनात घडू दे.’ त्या वेळी मी केलेल्या प्रार्थनेमुळे माझी काळजी दूर होऊन माझे मन निर्मळ होत असल्याचे मी अनुभवले आणि ‘पिंजर्यातून पक्षी मुक्त व्हावा’, तसे मला वाटले.

ती अनुभूती आठवल्यापासून ज्या वेळी मनात चिंता उत्पन्न होते, त्या वेळी मी प्रयत्नपूर्वक वरील प्रार्थना करू लागलो. ही प्रार्थना केल्यावर माझे मन काळजीमुक्त होण्याचा अनुभव मी घेत आहे. गुरुदेवांनी या कोडग्या जिवाला नेहमीप्रमाणे सावरले आहे. ‘व्यर्थ चिंतांवरील रामबाण उपायाची त्यांच्या कृपेमुळेच मला आठवण झाली’, याची मला खात्री आहे.
‘हे कृपाळू गुरुमाऊली, सर्व साधकांकडून तुम्हाला अपेक्षित अशी साधना करवून घ्यावी’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
– श्री. दीपक रामचंद्र छत्रे, रायंगिणी, बांदोडा, फोंडा, गोवा. (९.२.२०२५)